महाराष्ट्रात रोज वेगवेगळ्या घटना घडत असतात. अशीच एक कौतुकास्पद आणि काहीशी वेगळी घटना अमरावती जिल्ह्यात घडली असून वीस वर्षांपूर्वी लग्न झालेल्या आणि त्यानंतर आपल्या पतीला सोडून दुसरीकडे लग्न करणाऱ्या एका महिलेने पुन्हा आपल्या आधीच्या पतीकडे येऊन लग्न केले आहे . विशेष म्हणजे तिच्या आधीच्या पतीने देखील झाले गेले विसरून तिच्याशी पुन्हा संसार थाटला असून या पतीचे परिसरात चांगलेच कौतुक केले जात आहे .
अमरावती येथील अंजनगावसुर्जी तालुक्यातील ही घटना असून मुऱ्हा येथील श्यामराव मोरे यांची मुलगी सुगंधाचा विवाह वीस वर्षांपूर्वी अकोला जिल्ह्यातील लाखपुरी (ता. मूर्तिजापूर) येथील संतोष जामनिक यांच्याशी झाला होता. सात वर्षे संसार सुरळीत चालला मात्र त्यानंतर दोघांमध्ये वारंवार भांडणे होऊ लागली. शेवटी दुर्दैवाने सुगंधा पतीला सोडून माहेरी आली आणि दोन वर्षात तिने पुन्हा दुसरीकडे लग्न केले मात्र तिथे देखील तिची पुन्हा भांडणे सुरु झाली आणि ती पुन्हा माहेरी येऊन राहू लागली
सुगंधा परिसरात शेतीचे कामे करून उपजीविका भागवित होती. सुगंधाला अद्यापही अपत्य झालेले नव्हते तर दुसरीकडे सुगंधाचा पहिला पती संतोष जामनिक याने देखील पहिली पत्नी सोडून गेल्यावर दुसरा संसार थाटला नव्हता. वीस वर्षांनंतर संतोष पुन्हा सुगंधाच्या आई-वडिलांच्या भेटीसाठी आला आणि त्याने सुगंधा सोबत पुनर्विवाह करण्याची इच्छा त्यांच्याकडे बोलून दाखविली
झालं गेलं विसरून जाऊन यापुढे भांडणे होणार नाहीत ‘ असे आश्वासन त्याने सुगंधाच्या आईवडिलांना दिले आणि त्यांनी देखील सुगंधाला याबद्दल तिचे मत विचारले असता तिने होकार देताच पुन्हा दोघांनी बुद्धविहारात लग्न केले. त्यांच्या हा पुनर्विवाहासाठी आशीर्वाद देण्यासाठी गावातील नागरिक व नातेवाईक उपस्थित होते. परिसरात या विवाहाची जोरदार चर्चा असून या दोघांचेही कौतुक केले जात आहे .
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा