माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगीनींनो…,राज ठाकरेंचे नवे आवाहन…
मुंबई (झू म वृत्तसेवा) आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आपल्या पक्षाचा विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी कालपासून मनसेच्या सदस्य नोंदणी मोहिमेला पुण्यातून सुरूवात झाली. यावेळी सर्वांत आधी राज ठाकरेंनी स्वतःची नोंदणी सदस्य म्हणून केली. निवडणूक आयोगाच्या नियमानुसार प्रत्येक पक्षाला दोन ते अडीच वर्षानंतर सदस्य नोंदणी करावी लागते. त्यानुसार ही नोंदणी होत असल्याचे राज ठाकरे यांनी यावेळी सांगितले. दरम्यान आज राज ठाकरे यांनी एक ऑडिओ क्लिप जारी करत हिंदू बांधवांना आणि भगीनींना एक नवे आवाहन केले आहे.
"माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो…"https://t.co/7CdUZLzsR7 #मनसे_सदस्य_नोंदणी pic.twitter.com/WeRehmqc6N
— Raj Thackeray (@RajThackeray) August 27, 2022
माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगीनींनो आणि मातांनो.. नमस्कार, मी राज ठाकरे हिंदवी उत्कर्षासाठी आणि महाराष्ट्राच्या भल्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना कायमच कटीबद्ध आहे. आपलं कार्य अधिक व्यापक करण्यासाठी आपण पक्षाची सदस्य नोंदणी नव्याने सुरू करत आहोत. माझं तुम्हाला कळकळीचं आवाहन आहे, की तुम्ही तर सदस्य व्हायचे आहे. पण, परंतु उतरांनाही म्हणजे आपले मित्र, नातेवाईक, विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील स्नेही यांनाही सदस्य करून घ्यायचे आहे. त्यानंतर सदस्य नोंदणी ऑनलाईन कशी करायची याची माहिती राज ठाकरे यांनी दिली आहे.

यावेळेला जे सदस्य होणार आहेत त्या सदस्याला प्रत्येक आठवड्यात काहीतरी नवीन गोष्ट पक्षाकडून त्यांच्या मोबाईलवर जाणार आहे. त्यामध्ये माझे भाषणं असतील, महाराष्ट्रासंबंधी काही विषय असतील अशा गोष्टी सदस्याला आमच्याकडून देण्यात येणार आहेत, या सदस्य नोंदणीमध्ये मी माझं पहिले नाव नोंदवले आहे. तुम्हीही मोठ्या संख्येने या मोहिमेत सहभागी व्हावे, असे अवाहन राज ठाकरे यांनी केले आहे.





