आपल खान्देशराजकीय

आता राष्ट्रवादीचे पुढील टार्गेट जळगाव; जयंत पाटील निवडणुकांची रणनीती ठरवणार..

जळगाव (झूम वृत्तसेवा) आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी राष्ट्रवादीने कंबर कसली आहे. एकेकाळी भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळख असलेल्या जळगाव जिल्ह्यात पक्षाचा झेंडा फडकवण्यासाठी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे उद्या जळगाव दौर्‍यावर येत आहेत. या दौर्‍यात आगामी काळात होणार्‍या जिल्हा परिषद आणि नगरपरिषदांच्या निवडणुकीसंदर्भात सकाळी पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन रणनीती ठरवणार आहेत.

या बैठकीला माजी आमदार अरुण गुजराथी, आमदार एकनाथ  खडसे, अनिल पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष डॉ.सतीश पाटील, जिल्हा बँकेचे अध्यक्ष गुलाबराव देवकर, माजी आमदार दिलीप वाघ, जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रवींद्र पाटील, माजी खासदार वसंतराव मोरे, ईश्वरलाल जैन, माजी आमदार राजीव देशमुख, दिलीप सोनवणे, रोहिणी खडसे, महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी, महिला शहराध्यक्ष मंगला पाटील, सहकार विभागाचे जिल्हाध्यक्ष वाल्मीक पाटील यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित  राहणार आहेत. बैठकीत आगामी काळात होणार्‍या निवडणुकीसंदर्भात चर्चा करणे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संघटनात्मक बांधणीवर चर्चा करणे, आयत्या वेळी येणार्‍या विषयांवर चर्चा केली जाणार आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे