आपल खान्देश

पाचोरा तालुक्यातील कुऱ्हाड बु. सरपंच अपात्र,  सरकारी जागेवर घरकुल व जादा बांधकाम, केल्याचे प्रकरण भोवले


जळगाव (झूम प्रतिनिधि) कुऱ्हाड बु. ता पाचोरा येथील ग्राम पंचायतीचे सरपंच उदयसिंग लखिचंद राठोड यांनी खाजगी मालकीची जागा मिळकत असतांना देखील सरकारी गावठान जागेवर अतिक्रमण करून घरकुलाचे बांधकाम केल्यामुळे त्यांना सरपंच व सदस्य पदावरुन अपात्र ठरविण्यात यावे म्हणून राजू सखाराम राठोड व राजू भूरा राठोड यांनी तक्रार अर्ज दाखल केला होता. त्यावर सखोल चौकशी होऊन शासकीय जागेवर बेकायदा अतिक्रमण करून इंदिरा आवास योजनेतुन राहते घराचे बांधकाम केल्याचे सिद्ध झाल्यामुळे, जळगाव जिल्हाधिकारी डॉ. अभिजित राऊत. यांनी उदयसिंग राठोड यांना सरपंच व सदस्य पदावरुन नुकतेच अपात्र ठरविले आहे.

या बाबत सर्विस्तर वॄत असे कि सरपंच उदयसिंग राठोड यांचे नावे जागा मिळकत क्र 15 ही खाजगी जागा असतांना त्यांनी ग्रा प. जागा मिळकत क्र. 210 या सरकारी जमिनीवर विना परवानगी अतिक्रमण करुण घरकुलाचे बांधकाम केल्यामुळे व एकत्र कुटुंब सह लाभ घेत असल्यामुळे त्यांना सदस्य व सरपंच पदावरुन अपात्र ठरविण्यात यावे. म्हणून श्री राजू सखाराम राठोड व श्री राजू भूरा राठोड यांनी ग्रा. प. अधिनियम 1958 चे कलम 14.जे- 3 प्रमाणे जिल्हाधिकारी जळगाव यांचे कडे विवाद अर्ज क्र-27/ 022.ने तक्रार दाखल केली असता त्यावर कायदेशीर सुनावणी होऊन सरपंच यांनी स्वतःची खाजगी जागा मिळकत असताना देखील शासकीय गावठान जागा क्र 210 या जागा मिळकती वर इंदिरा आवास योजनेतुन घरकुल बांधकाम केले आहे तसेच सार्वजनिक जागेवर 16फुट जादा वाढीव बांधकाम केलेले आहे. सरपंच यांनी स्वत: ची खाजगी जागा सुरक्षित ठेऊन शासकीय व सार्वजनिक जागेवर अतिक्रमन केल्याचे सिद्ध झाल्यामुळे. जिल्हाधिकारी डॉ अभिजीत राऊत यांनी उदयसिंग लखिचंद राठोड यांना ग्रा.प.सरपंच व सदस्य पदावरून अपात्र घोषित केले आहे.या निकाला मुळे ग्रामस्थांन मध्ये समाधानाचे वातावरण तयार झाले असुन. जिह्यातील ग्राम पंचायत पदाधिकारी यांचेत खळबळ उडाली आहे. तक्ररदार  राजू राठोड व श् राजू भूरा राठोड. यांचे वतीने अँड. विश्वासराव भोसले(पिंपरखेड) यांनी काम पाहिले. या निकाला कडे तालुक्याचे लक्ष्य लागुण होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे