आपल खान्देशब्रेकिंग

Nashik Crimes | खुलेआम गुंडाराजची चलती, त्र्यंबकेश्वरात पत्रकारांना मारलं…

 


नाशिक जिल्ह्यात चार मंत्री असूनही, गुंडागर्दी आणि अपराध वाढतच आहेत. नुकतीच आज सकाळी नाशिकच्या त्र्यंबकेश्वर येथे काही गुंडांनी पत्रकारांना बेदम मारहाण केली. या पत्रकारांना कुंभमेळ्याच्या बैठकीच्या वार्तांकनासाठी आले असताना पावती फाडणाऱ्यांनी त्यांना अडवले आणि मारहाण केली. पत्रकार किरण ताजणे, योगेश खरे आणि अभिजित सोनावणे यांना यात गंभीर दुखापत झाली. याशिवाय, नाशिकमध्ये भरदिवस महिला अपहरण, गोळीबार आणि चोरीच्या घटनाही घडल्या आहेत. जिल्ह्यात चार मंत्री असूनही पालकमंत्री नियुक्त नसल्याने कायदा व सुव्यवस्था बिघडत असल्याची चर्चा सुरू आहे. या घटनेनंतर गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Zoom Team

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे