देश-विदेश
धक्कादायक; छत्तीसगडमध्ये नक्षलवादी हल्ल्यात २४ जवान शहीद
छत्तीसगड येथील नक्षल प्रभावित बीजापूर आणि सुकमा या जिल्ह्याच्या सीमेवर नक्षलवादी आणि सुरक्षारक्षकांमध्ये झालेल्या चकमकीत २४ जवान शहीद झाले असून सुरक्षा दलाला बेपत्ता झालेल्या १७ जवानांचे मृतदेह मिळून आले. या हल्ल्यानंतर केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी आसामचा दौरा रद्द केलाय.कुख्यात नक्षली हिडमा याला पकडण्यासाठी जवान नक्षलवाद्यांच्या जंगल भागात घुसले होते.नक्षलवाद्यांनी जवानांना घनदाट जंगलात घुसू दिलं. त्यानंतर त्यांच्यावर अंधाधुंद गोळीबार केला.


