‘ते’ ७५ जण सेवा द्यायला आले अन् घरी परतलेच नाहीत, रुग्णालयातच घेतला अखेरचा श्वास
कोरोना संकटाने लोकांना नात्यापासून दूर केले. त्यांना कोरोना योद्ध्यांना अखेरच्या क्षणी आपल्या माणसांशी भेटता आले नाही. त्यांच्या अंत्यसंस्कारालाही कुणाला जाता आलं नाही. केवळ चेहरा बघून महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी त्यांचा अंत्यसंस्कार उरकून घेतला. या कोविड शहिदांना अखेरची सलामीही देता आली नाही.
नागपूर : कोरोना संकटकाळात डॉक्टर परिचारिका कोरोनाबाधित नागरिकांचा जीव वाचवण्यासाठी जसे वॉर्डात लढत आहेत. त्याच धर्तीवर पॅरामेडिकल स्टाफ, रुग्णवाहिका चालक, आशा वर्कर, अटेन्डन्ट, सफाई कामगार, पोलिस हे फ्रंटलाईन वर्कर्स जिवाची पर्वा न करता रस्त्यावर कोरोना योद्धे म्हणून सेवा देत आहेत. कोरोना काळात कोविड योद्ध्यांनी या फ्रन्टलाईन वर्करनी दिवस रात्र मेहनत घेतली. अनेकांना कोरोनाने विळख्यात घेतले. रुग्णालयात उपचार घेणारे जिल्ह्यातील सुमारे ७५ पेक्षा अधिक कोविड योद्धे (फ्रन्टलाईन वर्कर) घरी परतलेच नाहीत. रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.



