पाचोरा येथील शाहूनगर साईबाबा मंदिर वर्धापन दिन सोहळा साजरा
झूम मराठी वृत्तसेवा- दिलीप परदेशी
पाचोरा शहरातील शाहूनगरातील श्री साईबाबा मंदिराच्या आकाराव्या वर्धापन दिनानिमित्त दोन दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. करोनाचे नियम पाळून सुमारे हजारो भाविकांनी दर्शन तसेच कार्यक्रमाचा लाभ घेतला.
प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून, 26 जानेवारी 2011 रोजी शाहूनगरातील साईभक्तांनी हे मंदिर लोक वर्गणीतून निर्माण करण्यात आले. दरवर्षी वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला येथे हजारो भाविकांची गर्दी होत असते. वर्धापन दिन सोहळा हा शाहूनगराचा व आजूबाजूच्या परिसरातील उत्सव बनून गेला आहे. गेल्या 10 वर्षांत या साई मंदिर ट्रस्टने धार्मिक कार्यक्रमांसह सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमही मोठ्या प्रमाणात राबवले.
मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त मंदिर परिसरात रोषणाई करण्यात आली होती, श्री साईबाबा यांची पालखी निघाली असता स्वागतासाठी प्रत्येक घराच्या आंगणात रांगोळी काढण्यात आली होती. महाप्रसादाचा सर्व नागरिकांनी लाभ घेतला.





