महाराष्ट्र आणखी गारठणार! येत्या २४ तासांत ‘या’ भागात थंडीची लाट
महाराष्ट्र आणखी गारठणार! येत्या २४ तासांत ‘या’ भागात थंडीची लाट
झूम मराठी वृत्तसेवा
मुंबई (प्रतिनिधी): राज्यात गेल्या तीन-चार दिवसांपासून थंडीचा कडाका वाढला आहे.तसेच येत्या २४ तासांत तापमानात आणखी घसरण होण्याची शक्यता आहे.त्यामुळे हवेत गारवा निर्माण होऊन थंडीची लाट येण्याची शक्यता आहे.
याबाबत हवामान विभागाकडून अंदाज वर्तवण्यात आला आहे. गेल्या २४ तासांत विदर्भातील बुलडाणा आणि नागपुरातील तापमान ९ अंशापर्यंत खाली आलं होतं. पुढील 2 दिवसांत महाराष्ट्रातील विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि गुजरात राज्यात थंडीची लाट येण्याची शक्यता आहे. तसेच पंजाब, हरियाणा-चंदीगड-दिल्ली, उत्तर राजस्थान, मध्य प्रदेश, ओडिशा आणि छत्तीसगडमध्ये पुढील 3-4 दिवस कडाक्याची थंडी असेल.
उत्तरेकडे १४ जानेवारीपासून बर्फवृष्टी सुरू आहे. त्यामुळे महाराष्ट्रात थंडीची लाट व गार वारे आहे. या वाऱ्यांमुळे दिवसभर अंगातील स्वेटर काढावेसे वाटत नाही. हे गार वारे वृद्ध, आजारी व्यक्ती व बालकांना असह्य होत आहेत. त्याचबरोबर रब्बी हंगामातील पिकांवरही त्याचा परिणाम जाणवत आहे.



