महाराष्ट्र

नांदगाव कार्यालयात पिण्याच्या पाण्याची टाकी शोभेची वस्तू, नागरिकांना पिण्याचे पाणी उपलब्ध नाही ही मोठी शोकांतिका.


झूम मराठी न्यूज नेटवर्क

 नांदगाव नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील नांदगाव तहसील कार्यालय येथील पिण्याच्या पाण्याची टाकी ही शोभेची वस्तू बनली आहे. नांदगाव तहसील कार्यालय मध्ये तालुक्यातील संपूर्ण गावातून नागरिक काही शासकीय कामाकरिता येत असतात. नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी पाण्याची टाकी असून देखील पिण्याचे पाणी उपलब्ध होत नाही. ही एक मोठी शोकांतिका आहे.

नांदगाव तालुक्यातील संपूर्ण प्रशासकीय कार्यालय आहे. याकरिता शासनाने 2018/ 2019 या कालावधीत सार्वजनिक बांधकाम विभाग व जीवन प्राधिकरण यांच्या अंतर्गत लाखो रुपयांचा खर्च करून ऐंशी लिटर जलकुंभ बांधला 2018/2019 प्रशासकीय इमारत बांधकाम 2013 करण्यात आले ‌ तर पिण्याच्या पाण्याचे जलकुंभ 2018 मध्ये बांधण्यात आले आहे. म्हणजे पाच वर्षानंतर पाणी परंतु सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री महोदय यांच्या हस्ते 2013ला प्रशासकीय इमारत पूर्ण झाली. तालुक्यातील शेतकरी, निराधार महिला, वयोवृद्ध नागरिक शासकीय कामाकरिता येत असतात. नांदगाव तहसील कार्यालयाचे भाग्य आलेल्या नागरिकांना पाण्यापासून वंचित ठेवत एकीकडे सरकार शिवभजन अशा मोठमोठ्या स्किमा राबवित आहे. साधे नांदगाव तालुक्यातील शेतकरी, वयोवृद्ध निराधार महिला यांना पाण्यावाचून वन वन करावे लागते. फक्त पाण्याचा जलकुंभ हा उपोषण करण्याकरिता आज तरी दिसत आहे. विशेष म्हणजे मा. तहसीलदार यांच्या केबिनच्या अंतरावर शोभेचे 300 लिटर ची रिकामी टाकी ठेवून जनतेची जाणून-बुजून जनतेच्या भावनेशी खेळत, शेता कुंपण खाते तर न्याय कुठे मिळणार असे सर्वसामान्य नागरिक चर्चा करीत आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे