महाराष्ट्र

रेल्वे हद्दीतील बांधकाम धारकांचे अतिक्रमण थांबविण्यासंदर्भात आम्ही सकारात्मक…..पण – रेणू शर्मा  

झूम मराठी वृत्तसेवा

पिंपरी-चिंचवड (उमेश पाटील) आनंदवनवस्ती फुगेवाडी,दापोडी रेल्वेलाईन हद्दीलगत असणाऱ्या बांधकाम झोपडपट्टी धारकांना जागा रिकामी करण्या संदर्भात रेल्वे प्रशासनाकडून नोटीस देण्यात आल्या असून स्थानिक महानगरपालिका प्रशासन व राज्य सरकारकडून पुनर्वसन करून मिळेपर्यंत अतिक्रमण कारवाई न करण्याचे संदर्भात व दापोडी येथील रेल्वेगेट येते हलक्‍या गतीच्या वाहनांसाठी उड्डाणपूल करण्याबाबत भाजपा शहर सचिव व रेल्वे सल्लागार समिती सदस्य विशाल वाळुंजकर यांनी पुणे डिव्हिजन रेल्वे मॅनेजर रेणू शर्मा यांच्याकडे मागणी करण्यात आली.

याबाबत स्थानिक महापालिका प्रशासन व राज्य शासना ला नोटिसा देऊन व स्थानिक प्रशासन व राज्य सरकार यांच्या संयुक्त बैठक घेऊन निर्णय घेण्यात यावे रेल्वे हद्दतील नागरिक सर्वसामान्य , गरीब असून अचानक पणे होणारी कारवाई ही अन्यायकारक असेल तसेच दापोडी रेल्वे स्टेशन येते सांगवी ,पिंपळे गुरव,काटे पिंपळे, व पिंपळे सौदागर औंध,बाणेर हिंजवडी येतून रेल्वे प्रवासा साठी येत असतात दापोडी येते रेल्वे गेट लगत अनेक अपघात होत असतात तसेच शेजारीच भाजी मार्केट असून आपण हलक्यागती दुचाकी ,तीनचाकी व चारचाकी साठी वाहनांचा उड्डाणपूल करण्यात यावा व गरजे नुसार खडकी ते मळवली असणारे रेल्वे गेट ठिकाणी भुयारी मार्ग किंवा रेल्वे उड्डाणपूल करण्या यावे विशाल वाळुंजकर यांनी अशी मागणी निवेदन देऊन करण्यात आली.

तर याबाबत.पुणे डिव्हिजन रेल्वे मॅनेजर रेणू शर्मा हे रेल्वे हद्दी लगत बांधकाम असणारे सर्व सामान्य नागरिकांचा विचारकरता अचानकपणे अतिक्रमण कारवाई करण्यात येणार नाही याबाबत आम्ही सकात्मक असून रेल्वे प्रशासनाने स्थानिक मनपा व राज्य सरकार ला नोटीस सुद्दा देण्यात आले आहे व प्राथमिक चर्चा केली असून तसेच रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे हे स्वतः पुढाकार घेऊन राज्य सरकारकडे पाठपुरावा करीत आहे….पण राज्य सरकार किंवा स्थानिक प्रशासना कडून अजून कोणतेही ठोस आश्वासन मिळाले नाही तरी सर्व सामान्य नागरिकांचा विचार करता आम्ही याबत पुन्हा नोटीस देणार असून, यानंतरच आम्ही मिळालेल्या कोर्टच्या निर्णयानुसार कारवाई करू असे रेणू शर्मा बोलताना व्यक्त केले 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे