महाराष्ट्र

धक्कादायक! नाशिकमध्ये एसटी चालकाची गळफास लावून आत्महत्या!

झूम मराठी वृत्तसेवा

नाशिक: मागील चार महिन्या आधीपासून एसटी कर्मचाऱ्याने हा विलीनीकरणासाठी आझाद मैदान येथे हा संप पुकारला आहे. मात्र एसटी कर्मचारी हे विलीनीकरणासाठी अजूनही अडून बसले आहेत. एसटीचे शासकीय सेवेत विलिनीकरण करणं शक्य नाही असे अहवालात सांगण्यात आले आहे. राज्य मंत्रिमंडळात या अहवालावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. असे असताना नाशिक मध्ये एका एसटी कर्मचाऱ्याने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.

नाशिक मध्ये एका एसटी कर्मचाऱ्याने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. शिवनाथ फापाडे असे एसटी कर्मचाऱ्याचे नाव आहे. फापाडे शहापूर आगारात कामाला होते. गेले आठ वर्ष्यापासून फापाडे एसटी महामंडळात एसटी ड्रायव्हर म्हणून काम करत होते. ड्युटी नसल्याने आर्थिक संकट सुद्धा होते. पत्नी आणि तीन मुलं त्यांचा सांभाळ कसा करावा या विवंचनेत आत्महत्या केली असल्यालाचा त्याच्या नातेवाईकांनी म्हटलंय. तर गंगापूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मुंबईत विधिमंडळात अर्थ सकल्पीय अधिवेशनात आज पर पडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत एसटीच्या विलीनीकरण संदर्भात निर्णय घेण्यात आला. दरम्यान तत्पूर्वी राज्य परिवहन महामंडळाचे राज्य शासनामध्ये विलिनीकरण करावे या मागणीसाठी एसटी कर्मचारी गेल्या 4 महिन्यांहून अधिककाळ बेमुदत संपावर असल्याने या संपाच्या मुद्यावर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली आहे.

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे