ब्रेकिंग

अखिल भारतीय प्रहार न्यायमंच आश्रमशाळा संघटना जळगाव जिल्ह्याची कार्यकारिणी जाहीर.

अखिल भारतीय प्रहार न्यायमंच आश्रमशाळा संघटना जळगाव जिल्ह्याची कार्यकारिणी जाहीर.इतर मागास बहुजन कल्याण विभागाअंतर्गत सुरु असलेल्या निवासी आश्रमशाळेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्याच्या सेवा विषयक समस्या जिल्हा स्तरावर मांडण्यासाठी व सोडविण्यासाठी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या प्रमुख मार्गदर्शनात, संघटनेचे राज्याध्यक्ष महेश डवरे व राज्य सचिव हेमंत मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत जिल्हा कार्यकारिणी गठीत करण्यात आली. कार्यकारणीत जिल्हाध्यक्ष स्थानी आबा पाटील – जिल्हाध्यक्ष, सतीश वाघ – उप जिल्हाध्यक्ष, प्रकाश पाटील – सचिव, प्रमोद निकुंभे – सह सचिव, सर्जेराव पाटील – कार्याध्यक्ष, अनिल आहिरे – सह कार्याध्यक्ष, संजय पाटील – संपर्क प्रमुख, नितीन चव्हाण – प्रसिद्धी प्रमुख, अरुण परदेशी – संघटक, धनंजय सैंदाने – सदस्य, सचिन काकडे – सदस्य, जगन्नाथ वाणी – सदस्य यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. जिल्ह्याच्या नूतन कार्यकारिणीस प्रामाणिक कार्यासाठी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे