गुन्हेगारीब्रेकिंग

प्राध्यपकाचा गळा चिरुन हाताच्या नसा कापून निर्घृण खून!!

औरंगाबाद शहरात एका प्राध्यापकाच्या विचित्र खूनाच्या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. औरंगाबाद शहरातील एका महाविद्यालयात शिकवणाऱ्या प्राध्यापकाची राहत्या घरात गळा चिरून आणि हाताच्या नसा कापून निर्घृण हत्या केल्याची खळबळजन घटना समोर आली आहे.

सदर धक्कादायक घटना औरंगाबाद शहरातील सिडको एन 2 भागात उघडकीस आली आहे. डॉ. राजन हरिभाऊ शिंदे असे खून झालेल्या प्राध्यपकाचं नाव आहे. मागील 12 तासामध्ये खूनची ही दुसरी घटना असून या घटनांमुळे शहर हादरुन गेलं आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत प्राध्यापक डॉ. शिंदे हे औरंगाबाद शहरातील मौलाना आझाद महाविद्यालयात इंग्रजी विषय शिकवतात. आज पहाटे त्यांचे कुटुंबीय झोपेतून उठले असता, प्राध्यापक शिंदे हे घरातील हॉलमध्ये रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसून आले. हा प्रकार पाहताच कुटुंबीयांची पाया खालची जमनीनच सरकरली. यानंतर या घटनेची माहिती सिडको पोलीस ठाण्यात देण्यात आली.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून दिला. महत्त्वाचे म्हणजे घरातील केणतीही किमती वस्तू चोरीला गेलेली नाही. त्यामुळे ही हत्या कोणत्या कारणामुळे करण्यात आली, याचा तपास सिडको पोलीस करीत आहेत. मारेकऱ्याने मृत प्राध्यापकाचा गळा चिरुन त्यांच्या हाताच्या नसा कापल्या आहेत. रात्रभर झालेल्या रक्तस्त्रावामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे