महाराष्ट्र

सप्तशृंगी गड येथे ओबीसी राष्ट्रीय महिला महासंघाची बैठक संपन्न

कार्यक्रमाचे आयोजक कळवण तालुक्यातील दिपाली बच्छाव आणि उपाध्यक्ष सुनिता येवला यांच्या प्रयत्नांनी अतिशय नियोजनबध्द व सर्वसमावेश असा कार्यक्रम झाला

मालेगाव : प्रतिनिधी _   कळवण तालुक्यातील सप्तशृंगी गड येथे ओबीसी राष्ट्रीय महिला महासंघाची नासिक जिल्हा बैठक संपन्न झाली.या कार्यक्रमाप्रसंगी राष्ट्रीय ओबीसी महिला महासंघाच्या नाशिक जिल्हाध्यक्ष सौ.स्वाती वाणी यांनी अध्यक्षस्थान भूषविले.स्वाती वाणी,कविता मंडळ, सटाणा तालुकाध्यक्ष रुपाली कोठावदे,रेखा वाघ,

मालेगाव तालुकाध्यक्ष जयश्री धामणे, उपाध्यक्ष अलका भावसार, मालेगाव शहराध्यक्ष हर्षिता आहिरे शामल सुरते यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीपप्रज्वलन करण्यात आले.याप्रसंगी ओवी बच्छाव हिने “मी सावित्री बोलतेय”हा एकपात्री प्रयोग सादर केला. कविता मंडळ यांनी सावित्री बाई व ओबीसी विषयी माहीती दिली तसेच महिलांच्या पा़ळी मेन्स्ट्रअल कप संदर्भात शामल सुरते यांनी मार्गदर्शन केले. रेखा कोठावदे यांनीही सावित्रीबाईंच्या कार्याचा गौरव केला. तसेच सावित्रीबाईंच्या ओव्यांचे सामुहिकरीत्या गायन करण्यात आले.जिल्हाध्यक्ष स्वाती वाणी यांनी ओबीसी महिला महासंघ काय आहे,त्याची व्याप्ती आणि महत्व याविषयी अनमोल मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ललिता गुंजाळ यांनी केले.कार्यक्रमासाठी सटाणा,कळवण आणि मालेगाव राष्ट्रीय ओबीसी महिला महासंघाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.ओबीसी संदर्भातील घोषणांनी सर्व परिसर दुमदुमून गेला होता.आलेल्या सर्व मान्यवरांचे गुलाबपुष्प आणि महात्मा फुले यांची जीवनी देऊन स्वागत करण्यात आले.मान्यवरांचा परिचय कळवण तालुकाध्यक्ष दिपाली बच्छाव यांनी करून दिला.कार्यक्रमाचे आयोजक कळवण तालुक्यातील दिपाली बच्छाव आणि उपाध्यक्ष सुनिता येवला यांच्या प्रयत्नांनी अतिशय नियोजनबध्द व सर्वसमावेश असा कार्यक्रम झाला.कोव्हिडचे सर्व नियमांचे पालन करून आणि सप्तशृंगी देवीच्या दर्शनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.या कार्यक्रमाप्रसंगी कळवण,सटाणा आणि मालेगाव येथील पदाधिकाऱ्यांसह समस्त ओबीसी महिला सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होता.कळवण करांच्या अनमोल सहकार्याने सुनिता येवला यांनी आभार मानून कार्यक्रम यशस्वी पार पाडला.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे