महाराष्ट्र

सिंधुताई सपकाळ यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार, मुख्यमंत्र्यांच्या सूचना

अनाथांसाठी सेवाकार्य करणाऱ्या भारतीय सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ यांंचं ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्या ७३ वर्षांच्या होत्या. त्यांच्या जाण्याने पूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडला असून त्यांच्यावर आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. तश्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  यांनी दिल्या आहेत. अंत्यसंस्काराआधी त्यांचे पार्थिव दोन तासांसाठी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. सपकाळ यांच्या पार्थिवावर आज दुपारी १२ वाजून १० मिनीटांनी नवी पेठेतील ठोसर पागेल येथे महानुभाव पंथाच्या परंपरेनुसार दफणविधी केला जाईल.

अनाथांचा आधार तसेच हजारो लेकरांची माय अशी सिंधुताई सपकाळ यांची ओळख आहे. त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत अनाथ मुलांना वाढवलं. त्यांना आईची माया दिली. मात्र त्यांचे निधन झाल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातून हळहळ व्यक्त केली जात आहे. आज सिंधुताई सपकाळ यांच्यावर अंत्यसंस्कार केला जाणार आहे. अंत्यदर्शनाची वेळ संपल्यानंतर दुपारी १२ वाजून १० मिनिटांनी नवी पेठेतील ठोसर पागेल या भागात त्यांच्यावर महानुभाव पंथाच्या परंपरेनुसार अंत्यसंस्कार केले जातील. त्यांच्या पार्थिवावर दफनविधी केला जाईल.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे