मंत्री एकनाथ शिंदे हे अचानक पाचोऱ्यात चर्चेला उधान , येण्याचे कारण गुलदस्त्यात?
दिलीप परदेशी
झूम मराठी पाचोरा – आज राज्याचे नगर विकास मंत्री ना.एकनाथ शिंदे यांनी पाचोरा येथे खाजगी दौरा केला. मात्र त्यांच्या अचानक येण्या मागे काय कारण आज दिवसभर सोशल मिडीयात एकच चर्चा रंगली होती
दरम्यान, या दौऱ्यात त्यांनी कृष्णापुरी भागात भेट दिली असून ही भेट का होती याचे कारण गुलदस्त्यात आहे. पाचोरा शहरात सुरू असलेल्या चर्चेनुसार ना.एकनाथ शिंदे हे एका ज्योतिषीकडे हात दाखवायला आले होते तर दुसऱ्या चर्चेनुसार त्यांनी एका महाराजसोबत मंदिर प्रकल्पाबाबत चर्चा करण्यासाठी केली असल्याचे समजते.
माहितीनुसार, राज्याचे नगरविकास मंत्री ना.एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी सकाळीच हेलिकॉप्टरने जळगाव गाठले. पाचोऱ्याचे आ.किशोर पाटील हे त्यांच्या वाहनाने ना.शिंदे यांना घेण्यासाठी पोहचले. ना.शिंदे यांचा हा खाजगी दौरा होता. पाचोऱ्यातील कृष्णापुरी भागात त्यांनी निवडक मान्यवरांसह भेट दिली.
पाचोरा शहरात सुरू असलेल्या चर्चेनुसार नगरविकास मंत्री ना.एकनाथ शिंदे यांनी ज्योतिषी गजेंद्र जोशी यांचे घरी दुपारी १२ वाजेच्या सुमारास भेट देत चर्चा केली. एका खाजगी खोलीत फक्त ना.शिंदे व ज्योतिषी दोघांनी सुमारे तासभर चर्चा केली. दुसऱ्या एका चर्चेनुसार ना.एकनाथ शिंदे यांनी नगरविकास विभागामार्फत पाचोरा शहरात एक भव्य मंदिराचा प्रकल्प मंजूर केला आहे. पाचोरा न.पा.कडे निधी वर्ग करण्यात आला असून त्या संदर्भात ते मंगल भटजी नामक महाराजांकडे चर्चा करायला आल्याचे समजते. पाचोरा न.पा. डिसेंबर महिन्यात बरखास्त होणार असून आचारसंहिता लागू होण्यापूर्वी कामाला सुरुवात करण्याच्या दृष्टीने ही भेट असल्याचे समजते.
ZOOM Advertising





