महाराष्ट्र

डिसले मास्तरच्या डोक्यात गेली ग्लोबल हवा, प्रसिध्दीच्या नादात शिक्षण क्षेत्रातील झाले बुवा..

डिसले मास्तरच्या डोक्यात गेली ग्लोबल हवा
प्रसिध्दीच्या नादात शिक्षण क्षेत्रातील झाले बुवा

लेखन – हर्षल बागल

डिसले मास्तर हे नाव कुणालाही माहित नव्हतं … अगदी मास्तर ज्या परितेवाडी शाळेत शिकवत होते म्हणा त्या शाळेत देखील डिसले मास्तरांना कोण ओळखत नव्हतं हे नवलंच होते. परिते गावातल्या लोकांना इचारलं असता कोण डिसले मास्तर ? असाच गावकऱ्यांचा सुर निघाला …

एकदिशी जागतिक दर्जाचा ग्लोबल नावाचा कसला तरी पुरस्कार मिळाला अन लोकल डिसले मास्तर ग्लोबल झालं. मिडियातुन एकच बातमी झळकली .. अभिनंदनाचा वर्षाव झाला …

अगदी बार्शीच्या आमदारापासुन ते मंत्रीमंडळातील डझनभर मंत्र्यांनी मास्तरचा सत्कार केला. जिल्ह्यात मास्तरच्या एका मित्रानं त्यांना सत्कारासाटी गावात निमंत्रण साटी म्हणं फोन केला …तर मास्तर म्हणाले अयं लका..

गावातलं गल्लीतलं सत्कार घ्यायला मी काय बारिक हाय व्हय आत्ता … जगात माझा गाजावाजा झालाय … असा निरोप आल्याची चर्चा आत्ता माढा तालुक्याच्या मास्तर लोकांत ऐकायला हाय…असो…सवाल एक असा भी हाय की डिसले मास्तरांना जगातला लय मोटा पुरस्कार मिळाला तरी भी ज्या पंचायत समितीच्या परिघक्षेत्रात ते कामाला होते त्या माढा पंचायत समितीने डिसले मास्तरांचा सत्कार केला न्हाय… ऐवढंच काय जिल्ह्यातील एका बी शिक्षक संघटनेने मास्तरांचा विशेष सत्कार केला न्हाय, याची काय कारण ती शिक्षक व डिसले मास्तरांनाच माहित असावी…

एखाद्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणं म्हणुन यायला मास्तरांनी पैसं लागतात असा निरोप दिल्याच्या चर्चां ऐकायला आल्या. ग्लोबल झालेल्या डिसले मास्तरांच्या डोसक्यात पुरस्काराची हवा गेली हेच चित्र दिसुन येतयं…

हे पुरान संपतय तोपर्यंत डिसले मास्तरांना अमेरिकेतुन ऊच्चशिक्षणाला काँल आला वाटतं. त्यासाटी त्यांना पगारी सुट्टी पाहिजे म्हणुन शिक्षण अधिकाऱ्यांची दारं ऊघडली … पण आपण ज्या सिस्टीममध्ये काम करतो त्या सिस्टिमचा मास्तर ला लवकरच इसर पडला … साध्या अर्जावर रजा मंजुर करायची अतिघाई झाली होती. अमेरिका फिरायची हवा डोक्यात असल्याने मिडियासमोर आरोपांची दिवाळी साजरी केली. पण त्यांना कुटं माहित होतं की हे साधाळलेलं फटाके आपल्याच दारात आपलीच वाजवतील. पुरस्कार कसला होता . तयाचे निकष काय … स्थानिक प्रशासनाला याची कल्पना होती का असलं काय भी मास्तरांनी पत्राद्वारे कळवलं न्हाय… म्हणे काय तर तो माझा पर्सनल इषय हाय.. मग काय झेडपी च्या अधिकाऱ्यांची सटकली अन मास्तर सुट्टीची फाईल नियमात अडकवली … तसं मास्तर पण चुकलेच म्हणा नको ते आरोप करुन बसले… जसं स्वंयघोषित ह.भ.प बंडातात्या नशेत कडाडले ते अधात्मातील बुवा तर हे मास्तर शिक्षण क्षेत्रातील बुवा निघाले ऐवढेच काय…

आत्ता म्हणं झेडपीने मास्तरची पोलखोल करायला एक समिती नेमली होती त्याचा अहवाल तर लयच धक्कादायक हाय अशी मास्तर लोकांची कुर्डूवाडीच्या पंचायत समितीत चर्चा हाय त्यामुळे कदाचित डिसले मास्तरच्या समोरची पंचाईत वाढायची चिन्ह दिसतात

लेखन – हर्षल बागल
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे