ब्रेकिंग

भारतीय गानकोकिळा लता मंगेशकर यांचे निधन, देशावर शोककळा

लता मंगेशकर यांना 8 जानेवारी रोजी कोरोनाची लागण झाली. सोबतच त्यांना न्यूमोनियाही झाला होता. जवळपास गेल्या 30 दिवसांपासून लता मंगेशकर यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरु होते.

गेल्या आठ दशकांहून अधिक काळ संगीत विश्वावर अधिराज्य गाजवणाऱ्या ‘स्वर्गीय सुरांनी’ विराम घेतला. भारतरत्न, गानकोकिळा लता मंगेशकर  यांची प्राणज्योत मालवल्याची अत्यंत दुर्दैवी बातमी समोर आली आहे. वयाच्या 93 व्या वर्षी लतादीदींनी जगाचा निरोप घेतला. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात आयसीयूमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होते. कोरोनाची लागण झाल्यानंतर जवळपास महिनाभर त्या हॉस्पिटलमध्ये होत्या. लतादीदी उपचाराला प्रतिसादही देत होत्या, मात्र लतादीदींची तब्येत काल (शनिवारी) अचानक बिघडली. श्वसनाचा त्रास होत असल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. त्यांची प्रकृती चिंताजनक मात्र स्थिर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं होतं. मात्र रविवारी सकाळी 8.12 वाजण्याच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. फक्त देशच नाही, तर जगभरातील चाहत्यांना या बातमीने सुन्न केले आहे.

मल्टी-ऑर्गन फेल्युअरने निधन

रविवारी सकाळी 8 वाजून 12 मिनिटांनी लता मंगेशकर यांचे निधन झाले, अशी माहिती ब्रीच कँडी रुग्णालयतील डॉक्टर प्रतीत समदानी यांनी दिली. कोव्हिडची लागण झाल्यापासून 28 दिवसांहून अधिक कालावधीनंतर अवयव निकामी झाल्याने त्यांचे निधन झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे