सभासदांच्या हक्कांवर गदा? पाचोरा पीपल्स बँकेच्या निवडणुकीत उमेदवार डॉ. निलेश मराठे यांचे गंभीर प्रश्न..
दी पाचोरा पीपल्स पीपल्स बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीची धामधूम आता अंतिम टप्प्यात पोहचली असून मतदारांच्या मनात प्रश्नांची गर्दी निर्माण करणारी स्थिती निर्माण झाली आहे.सहकार पॅनलच्या नेत्यांकडून गेल्या पाच वर्षांच्या कारभाराचे कौतुक करत पारदर्शकता आणि कायदेशीरतेचा टेंबा मिरवत मते मागितली जात आहेत.मात्र याच सहकार पॅनलच्या कारभारात अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे निर्णय घेतले गेले असून हे प्रश्न थेट उमेदवार डॉ. निलेश विनायक मराठे यांनी उपस्थित केले आहेत.या निवडणुकीत केवळ निवडून येण्यासाठी पद्धतशीरपणे सदस्यांच्या मतदानाच्या हक्कांवर गदा आणणारे ठराव व कृती केल्या गेल्या,असा आरोपही त्यांनी उघडपणे केला आहे.
उमदेवार डॉ. निलेश मराठे यांनी उपस्थित केलेला एक अत्यंत गंभीर मुद्दा म्हणजे सभासदांच्या शेअर किमतीमध्ये अचानक वाढ करत जुने सभासद मतदानहक्कापासून दूर ठेवण्याचा कटकारस्थानाचा भाग. सुरुवातीस केवळ 51 रुपयांचे शेअर असलेले सदस्य हे बँकेचे अधिकृत सभासद होते आणि त्यांना मतदानाचा हक्क होता.
मात्र नवीन ठराव आणत हा हक्क बदलण्यात आला.यानुसार फक्त 1001 रुपयांचे शेअर असलेल्यांनाच मतदानाचा हक्क दिला गेला. हे करताना बँकेने सर्व सभासदांना वेळेवर माहिती न देता, केवळ काही ठराविक लोकांनाच नव्याने सभासद करून घेतले व त्यांना तातडीने 1001 रुपयांचे शेअर देवून मतदानाचा अधिकार दिला. ही योजना अगदी पद्धतशीरपणे अंमलात आणत हजारो जुने सभासद मतदानापासून वंचित ठेवले गेले, असा थेट आरोप उमेदवार डॉ. निलेश मराठे यांनी केला आहे. ते पुढे म्हणतात की,जर खरोखरच हे निर्णय सर्वांच्या हितासाठी होते,तर बँकेने स्थानिक वृत्तपत्रांमधून,सोशल मीडियावरून तसेच वैयक्तिक मेसेजद्वारे माहिती देऊन सर्व सभासदांना सूचित केले असते की “आपला शेअर फक्त 51 रुपयांचा आहे, आपल्याला मतदानाचा हक्क हवा असल्यास शेअरची रक्कम 1001 रुपये भरून ती सुधारणा करा.”मात्र तसे झाले नाही. याउलट,ही संधी केवळ आपल्याच गटातील, आपल्याच मर्जीतल्या लोकांना मिळावी म्हणून गुपचूप व्यवहार करत त्यांच्या नावावर शेअर्स काढले गेले. उर्वरित हजारो सभासद अंधारात ठेवून त्यांच्या मतदानाच्या मूलभूत अधिकारांवर गदा आणली गेली.
आज जे संचालक मंडळातील लोक मतदारांच्या दारापर्यंत जाऊन किंवा मोबाईलवरून मेसेज पाठवून मतदान मागत आहेत, त्यांनी आधी सभासदांना मतदानहक्कापासून वंचित ठेवले. या सर्व गोष्टी केवळ निवडणूक जिंकण्यासाठीच पद्धतशीरपणे घडवून आणल्या गेल्या असल्याचा संशय निर्माण होतो. मात्र, सभासदांनी या कटकारस्थानांना न जुमानता लोकशाहीचा खरा अर्थ समजून घेतला पाहिजे डॉ. निलेश मराठे यांनी या संदर्भात एक सशक्त भावनिक संदेश दिला असून असे सांगितले आहे की,”सभासदांनो,जरी तुम्हाला मतदानाचा हक्क मिळाला नसेल तरी प्रचाराचा अधिकार तुम्हाला लोकशाहीने दिला आहे.तुम्ही तुमच्या घरातील सदस्यांना,नातेवाईकांना,मित्रांना,ओळखीच्या व्यक्तींना डोळसपणे सत्य सांगून मत देण्याची विनंती करा.बँकेचा कारभार पुन्हा पारदर्शक व्हावा,सामान्य सभासदांचे हित जोपासले जावे,यासाठी तुमच्या जवळच्या व्यक्तींनी छत्र्या चिन्हावर फुलीचा शिक्का मारून डॉ. निलेश मराठे यांना विजयी करावे.”डॉ. निलेश मराठे यांनी नमूद केले की,“सभासदांनी त्यांच्या पैशाचा विनियोग कुठे होतो,कोणत्या मूल्याने होतो,याची संपूर्ण माहिती मिळवण्याचा हक्क आहे.सभासदांची बँक ही काही कोणाच्या मालकीची नाही,तर सर्वसामान्य सभासदांची आशा व विश्वास यावर उभी आहे.
”बँकेच्या प्रशासनातील अशा प्रकारचे निर्णय,जसे की शेअर रकमेवरून वर्गवारी निर्माण करणे,फक्त आपल्याच गटाच्या सभासदांची भरती,पारदर्शकतेचा अभाव आणि फसव्या पद्धतीने प्रचार,हे सर्व प्रकार एका गंभीर व्यवस्थात्मक षडयंत्राचे संकेत देत आहेत.निवडणुकीचा अंतिम टप्पा जवळ येत असताना मतदारांनी या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहावे,असे आवाहन उमेदवार डॉ. निलेश विनायक मराठे यांनी केले आहे.ते म्हणाले की,”आपण भावनांवर नव्हे,तर वास्तवाच्या आधारे निर्णय घ्यावा.निव्वळ मोह,आहेर,तोंडदेखली विनवणी किंवा खोट्या घोषणा याला बळी न पडता आपल्या मताच्या माध्यमातून बँकेच्या भविष्यासाठी योग्य व्यक्ती निवडावी.”एकंदरीत, सभासदांपासून मतदानाचे हक्क हिरावून घेणे, गरजेपुरतेच नव्या सभासदांची भरती करणे,शेअर रकमेवरून वर्गवारी निर्माण करणे आणि नियोजित व्यवहारात अपारदर्शकता या साऱ्यामुळे सहकार पॅनलवर प्रचंड संशयाचे मळभ निर्माण झाले आहे.हे सर्व निर्णय आणि त्यामागील हेतू आता मतदारांनी बारकाईने पाहणे आणि विचारपूर्वक निर्णय घेणे गरजेचे आहे.सभासदांच्या हितासाठी, पारदर्शकतेच्या व्यवस्थेसाठी, बँकेच्या प्रत्येक व्यवहारात जनतेचा विश्वास बहाल होण्यासाठी आणि सामान्य सभासदांना निर्णयप्रक्रियेचा भाग बनवण्यासाठी डॉ. निलेश विनायक मराठे यांना मत देणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन करत त्यांनी निवडणुकीच्या अखेरच्या क्षणात जनतेला ठाम संदेश दिला आहे की,“छत्र्या चिन्हाला दिलेले प्रत्येक मत हे सभासदांच्या हक्काच्या सुरक्षेसाठी आणि बँकेच्या निखळ व्यवस्थापनासाठी महत्त्वाचे ठरणार आहे.”
मतदार बांधवांना विनंती माझ्या माझ्या परिवाराचे सदस्य तसेच स्नेही जेवढे शक्य असेल तेवढे मतदारांशी प्रत्यक्ष संपर्क करण्याचा प्रयत्न केला परंतु मतदार यादीतील घोळ,खरे पत्ते व मोबाईल नंबर उपलब्ध न होणे यामुळे संपर्क होऊ शकला नाही म्हणून त्यांना ही बातमी व बातमी शब्द योग्य वाटत असेल त्यांनी बँकेच्या सभासदांपर्यंत सदस्य बातमी पोहोचवण्याची कृपा करावी ही विनंती



