दी पाचोरा पीपल्स को-ओ बँकेची उद्या रविवारी सर्वसाधारण नऊ जागेसाठी निवडणुक..
जळगाव जिल्ह्यातील चार तालुक्यात विस्तार असलेल्या दि पाचोरा पीपल्स को-ऑ सहकारी बँकेची उद्या 13 जुलै 2025 रविवारी रोजी सार्वत्रिक निवडणूक होत असून प्रचार संपला असून. सर्वसाधारण नऊ जागेसाठी दहा उमेदवार निवडणुकीला सामोरे जात आहेत
नऊ जागा सहकार पॅनल नऊ जागा लढवणार आणी डॉ निलेश पाटील एका जागेसाठी लढत होत असून, कोण बाजी मारतो हे मतदानानंतरच ठरणार आहे. या पंचवार्षिक निवडणुकीत एकूण १५ जागेसाठी निवडणुकीत होती त्यातील इतर मागास प्रवर्ग, अनुसूचित जाती जमाती, भटके विमुक्त, महिला राखीव जागा बिनविरोध झाल्या असून ही निवडणूक फक्त सर्वसाधारण बँकेच्या निवडणूक प्रक्रियेत 9 जागांसाठी एकूण 10 उमेदवार रिंगणात आहेत.
यामुळे साऱ्या तालुक्याचे लक्ष ह्या निवडणुकीकडे लागून आहे.१२ जानेवारी रोजी होणार मतदान आहे. पाचोरा येथे गो से हायस्कूलमध्ये मतदान होत असून नगरदेवळा, शेंदुर्णी, जामनेर, जळगाव, भडगाव ह्या ठिकाणी मतदान होत असून एकूण दहा हजार नऊशे चौपन्न सभासद मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहे.



