सांगली (प्रतिनिधी)एका मेंढीची किंमत सव्वा दोन लाखाहून अधिक मिळू शकते हे कुणालाही पटणार नाही. पण सांगलीच्या माडग्याळ बझारात एक मेंढी दोन लाख 33 हजाराला विकली गेली आहे. शेतकऱ्याच्या अशा तब्बल 6 मेंढ्या विकल्या गेल्या आहेत. त्यामुळे आनंदित झालेल्या शेतकऱ्याने या मेंढ्यांची हलगीच्या निनादात भव्य मिरवणूक काढत आनंद साजरा केला. जत तालुक्यातील माडग्याळ येथील मय्याप्पा चौगुले या शेतकऱ्याची सहा मेंढ्यांची तब्बल 14 लाख रुपयांना विक्री करण्यात आली आहे.
मेंढ्याना लाखो रुपयात भाव मिळाल्याने या मेंढ्यांची गावात मिरवणूक काढण्यात आली. माडग्याळ मधील मेंढीचे विशिष्ट चव आणि स्वाद असलेले मांस प्रसिद्ध आहे. त्यामुळे माडग्याळच्या मेंढीचे दर वाढले आहेत. माळ रानावर आणि दुष्काळी भागात कमीत कमी चारा खाऊन शेतकऱ्याला चांगला भाव या मेंढी मिळवून देत आहेत. तर माडग्याळचा बझार प्रसिद्ध आहे. बाजारात मोठ्या प्रमाणात मेंढी विक्रीस येत आहेत आणि विक्री देखील होत आहे. त्यामुळे या मेंढ्यांची मागणी देखील चांगलीच वाढू लागली आहे.
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा