आपल खान्देश

नागपूर-सुरत महामार्गावर इको कार आणि ट्रकचा अपघात

झूम मराठी वृत्तसेवा

धुळे : सुरत नागपूर महामार्गावर सध्या रस्त्याचे काम सुरू आहे, परंतु या रस्त्याचे काम गेल्या कित्येक वर्षांपासून सुरू असून हे काम अत्यंत संथ गतीने सुरू आहे. अशी माहिती नागरिकांकडून देण्यात आली आहे. आज काम सुरु असलेल्या रस्त्यावर इको व ट्रक आदळल्याने मोठा अपघात झाला. परंतु सुदैवाने या अपघातामध्ये कुठल्याही प्रकारची जीवीत हानी झाली नाही. परंतु वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

या ठिकाणी रस्त्याचे काम सुरू आहे, मात्र काम सुरू असलेल्या संदर्भात कुठलेही सुरक्षा बोर्ड लावण्यात आलेले नाही. त्यामुळे रोज छोटे-मोठे अपघात होण्याचे या ठिकाणी प्रमाण वाढले आहे. रस्त्याचे काम कोणत्या बाजूने सुरू आहे. याबाबत वाहनधारकही संभ्रमात असून यामुळेच अशा दुर्घटनांचा त्यांना सामना करावा लागत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी या ठिकाणी दुचाकी चालकाचा मृत्यू देखील झाल्याची घटना उघडकीस आली होती. यामुळे या रस्त्याचे काम पाहणाऱ्या कंत्राटदारास प्रशासनाने लवकरात लवकर रस्त्याचे काम पूर्ण करण्याचे आदेश द्यावे, अन्यथा या ठिकाणी निष्पाप नागरिकांचा बळी गेल्यास होणाऱ्या अपघातास सर्वस्वी आपण जबाबदार राहणार, असा इशाराही यावेळी देण्यात आला आहे. सततच्या होणाऱ्या या अपघातांमुळे सुरत नागपूर महामार्ग हा मृत्यूचा सापळा बनत चालला आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे