महाराष्ट्र

…..आणि शारदाताई खळखळून हसल्या !”         

डोक्यावरचे केस काढल्यानंतर मात्र त्यांनी खदखदून हसत आपल्याला मनापासून आनंद होत असल्याचे सांगताना हात जोडून अनिसचे आभारही मानले.

झूम मराठी वृत्तसेवा

सतारा – समाजात आजही अनेकांच्या मुंडक्यावर बसलेल अंधश्रध्देच भुत उतरता उतरत नाही. समाजातील अंधश्रध्देच हे भूत उतरवण्यासाठी अंधश्रध्दा निर्मुलन समिती काम करताना पहायला मिळते. याचेच एक उदाहरण आज साताऱ्यातील मल्हारपेठेत पहायला मिळाले. मल्हार पेठेत राहणाऱ्या शारदाताई बाबर यांच्या डोक्यावर गेली चार वर्षा पासून जटा वाढत चालल्या होत्या. या जटा वाढण्यामागचे कारण म्हणजे शारदाताई बाबर यांना देवाच्या जटा असल्याचे अनेकांनी डोक्यात बिंबवले. आणि त्यांनी त्या तशाच वाढवल्या.

मात्र या शारदाताईंच्या वाढत गेलेल्या केसांच्या गुंत्यामुळे त्यांच्या डोक्यावर सुमारे साडेतीन किलोपेक्षाही जास्त वजनाच्या ह्या जटा झाल्या होत्या. या वाढत चाललेल्या केसांच्या गुंत्यामुळे त्यांच्या डोक्यावर मोठ ओझ असल्याचे त्यांना अनेकवेळा जाणवत होते. शिवाय त्यांच्या मानेलाही त्रास होत होता. त्यांना झोपताना रात्रभर एकाच अंगावर झोपावे लागत असत आणि त्यामुळे त्यांचा खांद्यालाही वेदना होत होत्या. दरम्यान अंधश्रध्दा निर्मुलन समितीचे सुरेंद्र शिंदे यांनी आणि शारदाताई यांच्या बहिण उषा वायदंडे यांनी शारदाताई यांची समजूत काढली. शारदाताई या जटा काढण्यासाठी तयार झाल्यानंतर त्यांनी याबाबतची माहिती डॉ हमीद दाभोलकर यांना दिली. काही वेळातच महाराष्ट्र अनिसची टिम मल्हार पेठेत पोहचली. शारदाताई यांच्या सांगण्यानुसार मला डोक्यावरचे सर्वच केस काढायचे आहेत असा अट्टाहास धरल्यानंतर त्यांना जवळच्याच केशकर्तनालयात नेहण्यात आले आणि त्यांच्या डोक्यावरचे सर्वच केस काढण्यात आले. त्यांच्या डोक्यावरचे केस काढल्यानंतर मात्र त्यांनी खदखदून हसत आपल्याला मनापासून आनंद होत असल्याचे सांगताना हात जोडून अनिसचे आभारही मानले.

केस वेळचेवेळी न धूणे, न विंचरणे, त्याची निगा न राखणे या कारणातून ह्या जटा वाढत असतात. आणि जेंव्हा केसांचा गुंता तयार होतो तेंव्हा त्या एकमेकाला चिटकून रहातात आणि लोक त्याला देवाची जटा असे सांगून त्याची देवपूजा करायला सुरवात करतात. समाजातील या अंधश्रध्देच्या पायात अनेक महिलांच्या डोक्यावर तीन किलोच्या वरती आणि सुमारे 10-12 किलोची जट तयार होते. आणि याचा त्रास त्या संबधित महिलेला होत असतो. त्रास होत असताना त्या कोणाला सांगायलाही धजावत नाहीत कारण समाज काय म्हणेल या विचारात ती महिला हे डोक्यावरच ओझ तसच घेऊन आयुष्य जगत असते. त्यामुळे अशी जट असलेल्या महिलांनी अंधश्रध्दा निर्मुलन समितीशी संपर्क साधावा असे आवाहन डॉ हमीद दाभोलकर आणि सौ वंदना माने यांनी केले आहे.

यावेळी महाराष्ट्र अनिसच्या सौ वंदना माने आणि डॉ. दिपक माने, सुरेश शिंदे, संतोष साळुंखे हे उपस्थित होते

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Zoom Team

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे