आपल खान्देश
पाकिस्तानमधील वादळाचा पाचोरा व भडगाव तालुक्याला फटका; हवेत पसरले धुळीचे कण!
झूम मराठी वृत्तसेवा
पाचोरा (प्रतिनिधी) पाकिस्तानमधील धुळीच्या वादळाचा राज्याच्या वातावरणावर परिणाम दिसून येत आहे. सकाळपासून मुंबई आणि इतर शहरांमधील दृश्यमानता अतिशय कमी झाली आहे.
हवेमध्ये धुळीचे कण मिसळले आहेत. त्यात काल आणि आज अनेक भागात पाऊस पडल्याने अनेक गाड्यांवर आणि वस्तूंवर पांढरे डाग दिसून येत आहेत. अचानक वातावरणात झालेल्या बदलामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
धुळीचे वादळ पाकिस्तानमधील कराचीमध्ये आले होते. ते आता राजस्थान आणि गुजरात दिशेने सरकत आहे. त्यामुळेच वातावरणात सकाळपासून मळभ आणि धूळ दिसून येत आहे. या धुक्याच्या वादळाचा प्रभाव पाचोरा व भडगाव तालुक्यात दिसून आला. महामार्गांसह अनेक रस्त्यांवर धुळीचे साम्राज्य पहावयास मिळाले.



