आपल खान्देश

जळगाव तालुक्यात थंडीतही कडाडली, ओबीसी ची जागृतीची तोफ धडाडली!


 ३१ जानेवारी २०२२ रोजी राष्ट्रीय ओबीसी मोर्चा या सामाजिक संघटनेच्या नेतृत्वाखाली “भारत बंद” आयोजित केलेला आहे.

बामसेफ च्या 78 व्हिगस संपुर्ण भारतात कार्यरत असुन मोठा भाऊ ओबीसी ला आपल्या हक्कासाठी मैदानात उतरुन संघर्षमय वातावरण तयार करित आहे!जे ओबीसी मंत्री फक्त स्टेज वर बोलतात पण बामसेफ चा कार्यक्रम ग्राउंड लेव्हलचा आहे! आणि राष्ट्रीय कार्यक्रम आहे.

जळगाव तालुक्यातील भारत मुक्ती मोर्चा,बहुजन क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी जळगाव तालुक्यातील गावखेड्यातील ओबीसी बांधवांना “ओबीसींची जातीनिहाय जनगणना” व इतर विषयांवर जागृत करण्यासाठी “कॉर्नर मिटिंग” घेण्याचा सपाटा सुरु केला आहे.

  आज रात्री बेळी व निमगाव गावात “भारत बंद संदर्भात कॉर्नर मिटिंग घेण्यात आल्या, ही दोन्ही गावे लेवा पाटीदार (ओबीसी)समुहाची आहेत.या दोन्ही गावांच्या मिटिंगांना ९९% ओबीसी बांधव उपस्थित होते.सुमित्र अहिरे(खान्देश प्रभारी) यांनी ओबीसींची जातिनिहाय जनगणना का होत नाही? शेतकरी विरोधी ३ कायदे…या विषयावर सखोल माहिती दिली.

ही माहिती देताच उपस्थित असलेला ओबीसी बांधव जागृत झाला,व ३१ जानेवारी रोजी भारत बंदच्या समर्थनार्थ उभा राहिला. भारत बंदचे समर्थनार्थ बॅनर लावण्याचे आश्वासन दिले. यावेळी बेळी गावाचे प्रतिष्ठित नागरिक मा. खुशाल भाऊ भंगाळे यांची तर निमगाव गावाचे ग्रामपंचायत सदस्य मा.महेंद्रभाऊ मगरे यांची सेंटर प्रमुख म्हणुन सर्वानुमते निवड करण्यात आली. यावेळी जळगाव शहर युनिट चे मा.किशोरजी,मा.प्रकाशजी, मा.खुशालभाऊ सोनवणे व मा.इरफानभाई शेख यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे