महाराष्ट्र

ओबीसी मोर्चा च्या वतीने नांदगाव तहसीलदारांना निवेदन

ओबीसी मोर्चा च्या वतीने नांदगाव तहसीलदारांना निवेदन

नांदगाव (प्रतिनिधी) मुक्ताराम बागुल- आज दिनांक 12 जानेवारी 2022 रोजी नांदगाव येथील भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा च्या वतीने निवेदनाद्वारे प्रशासनाचे लक्ष वेधत पंजाब सरकारने 5 जानेवारी रोजी देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र जी मोदी पंजाब दौऱ्यावर असताना पंजाब येथील काँग्रेस सरकारने जी चूक केली त्याविरुद्ध आज आंदोलन करण्यात आले. व काँग्रेसचा आणि पंजाब सरकारचा निषेध करण्यात आला.

        पंजाब सरकार मुर्दाबाद, मोदी साहेब तुम आज बढो. देश का नेता कैसा हो, नरेंद्र मोदी जैसा हो. अशा विविध घोषणा देण्यात आल्या. सदर आंदोलन नांदगाव येथील हुतात्मा चौकात कोरोनाचे व शासकीय नियमांचे उल्लंघन न करता यशस्वी करण्यात आले. यावेळी ओबीसी मोर्चाच्या जिल्हा महामंत्री संजय बबनराव सानप, व्यापारी आघाडीचे जिल्हाध्यक्ष दत्तराज छाजेड, जिल्हा सचिव स्वप्नील शिंदे, सोशल मीडिया जिल्हाप्रमुख निशांत बोडखे, सुरेश कुमावत, मनोज सेठ शर्मा, कुणाल सौंदाणे, यांनी विशेष निवेदन नांदगाव तहसील कार्यालयाचे तहसीलदार डॉक्टर सिद्धार्थ मोरे व पोलीस निरीक्षक गाढे यांना निवेदन देऊन आमच्या भावना राज्य प्रशासनाकडे पाठवाव्यात अशी अपेक्षा केली.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे