राजमाता मासाहेब जिजाऊ यांच्या जयंती दिनानिमित्ताने ब्राह्मणगाव ग्रामपालिका च्या वतीने आयोजित महिला सक्षमीकरण व कौशल्य विकास प्रशिक्षण शिबिराचा उद्घाटन कार्यक्रम आज संपन्न

नांदगाव (प्रतिनिधी) मुक्ताराम बागुल- महिला व युवतींमध्ये आर्थिक, सामाजिक, राजकीय सक्षमीकरण प्रक्रिया वाढीस लागावी यासाठी ब्राह्मणगाव ग्रामर पालिकेच्या-15 व्या वित्त आयोग आराखड्यानुसार गावातील महिला व युवतींसाठी सात दिवसीय सक्षमीकरण व कौशल्य विकास प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन आज बुधवार दिनांक 12 जानेवारी 2022 रोजी मासाहेब जिजाऊ यांच्या जयंती दिनाच्या निमित्ताने ब्राह्मणगाव येथील सहकारी सोसायटीच्या सभागृहात उत्स्फूर्तपणे संपन्न झाले. या प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन जिल्हा परिषद सदस्य सौ लताताई बच्छाव, माजी जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर विलास बच्छाव, ज्येष्ठ नेते श्री यशवंत बापू अहिरे, m.v.p. संस्थेचे उपसभापती राघोनाना अहिरे, ब्राह्मणगाव ग्रामपालिकेचे उपसरपंच बापूराज खरे, ग्राम पालखीचे सदस्य श्री अरुण अहिरे, श्री रत्नाकर आहिरे, माजी सरपंच श्री सुभाष आहिरे यांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून उद्घाटन करण्यात आले. तसेच सर्व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते महापुरुषांच्या पत्नीचे पुष्पहार अर्पण करून पूजा करण्यात आली. यावेळी उपस्थित असलेल्या प्रमुख मान्यवरांचे ज्येष्ठ नेते यशवंत अहिरे, राघोनांना अहिरे, ज्येष्ठ सदस्य सौ रेखा अहिरे, सौ वंदना पगार यांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले. या कार्यक्रम प्रसंगी ब्राह्मणगाव ग्राम पालिकेचे उपसरपंच रिपब्लिकन पक्षाचे नाशिक जिल्हा उपाध्यक्ष श्री बापूराव खरे यांनी आपल्या प्रास्ताविकात या कार्यक्रमाबाबत तसेच ग्रामपालिका ग्राम ब्राह्मणगाव मार्फत येणाऱ्या विविध विकास कामांबाबत माहिती दिली. तसेच यावेळी जिल्हा परिषद सदस्य सौ लताताई बच्छाव, डॉक्टर विलास बच्छाव, यशवंत बापू अहिरे, सुभाष आहिरे, बचत गटाच्या संयोजिका सौ तनया शिरोळे, मासूम संस्था नाशिकचे प्रमुख श्री श्रावण देवरे यांनी यावेळी आपले मौलिक विचार व्यक्त केले. या उद्घाटन कार्यक्रमानंतर मासुं संस्थेच्या प्रशिक्षकांनी कौशल्य विकास प्रशिक्षण बाबत माहिती घेऊन प्रत्यक्षात प्रशिक्षणास सुरुवात केली. तसेच यावेळी ब्राह्मणगाव अंगणवाडी केंद्राच्या सेविकांना घड्याळाचे वाटप उपसरपंच श्री बापूराव खरे, ग्रामपालिका सदस्यां सौ रेखा अहिरे, सौ वंदना पगार, सौ रत्ना माली, ग्राम विकास अधिकारी श्री संजय पवार यांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी नाशिक जिल्हा परिषद सदस्या सौ लताताई बच्छाव, माजी जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर विलास बच्छाव, ज्येष्ठ नेते श्री यशवंत बापू अहिरे, एम व्ही संस्था नाशिकचे उपसभापती श्री राघोनाना अहिरे, उपसरपंच व रिपब्लिकन पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष श्री बापूराव खरे, ग्रामपालिका चे ज्येष्ठ सदस्य सर्वश्री अरुण अहिरे, श्री विनोद अहिरे, श्री रत्नाकर आहिरे, जनार्धन सोनवणे, माजी सरपंच श्री सुभाष आहिरे, माजी उपसरपंच श्री माधव पगार, ज्येष्ठ सदस्यां सौ वंदना पगार, सुरेखा अहिरे, सौ रत्ना माळी, केदाभाऊ ढेपले, पोलीस पाटील सौ वैशाली मालपाणी, ग्राम विकास अधिकारी श्री संजय पवार, सामाजिक कार्यकर्ते बापु माळी, श्यामा माळी, माजी उपसरपंच श्री विश्वास खरे, समाधान शेवाळे, गुलाब खरे, कैलास मालपाणी, प्रदीप सोनवणे, दीपक खरे, प्रमोद खरे, नाना अहिरे, दगा अण्णा अहिरे, तसेच अंगणवाडी कर्मचारी, महिला बचत गटाच्या अनेक महिला, युवती, तसेच अनेक कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यासाठी व चालणाऱ्या कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करून व मान्यवरांचे आभार ग्राम पालिकेची उपसरपंच श्री बापूराव खरे यांनी मानोले.
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा