राजकीय

नाशिक जिल्हा ग्रामीण नांदगाव तालुका काँग्रेस पर्यावरण नांदगाव तालुका अध्यक्षपदी विलास सरोवर यांची निवड

नाशिक जिल्हा ग्रामीण नांदगाव तालुका काँग्रेस पर्यावरण नांदगाव तालुका अध्यक्षपदी विलास सरोवर यांची निवड

नांदगाव(प्रतिनिधी) मुक्ताराम बागुल – महाराष्ट्र काँग्रेस प्रदेश काँग्रेस कमिटी अंतर्गत पर्यावरण विभागाच्या नाशिक जिल्हा ग्रामीण नांदगाव तालुका काँग्रेस पर्यावरण नांदगाव तालुका कमिटी तालुकाध्यक्षपदी नाशिक जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटी पर्यावरण विभाग पर्यावरण विभाग कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली असून नांदगाव तालुक्याचे काँग्रेसचे माजी आमदार अनिल दादा आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालयात झालेल्या बैठकीत नांदगाव तालुका काँग्रेस पर्यावरण समिती (कमिटी) नांदगाव तालुका अध्यक्षपदी श्री विलासराव यांची निवड करून नियुक्ती करण्यात आली.

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अध्यक्ष श्रीमती सोनिया गांधी तसेच अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष राहुलजी गांधी व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष श्री नानाभाऊ पटोले तर नाशिक जिल्हा काँग्रेस पर्यावरण विभागाचे प्रदेशाध्यक्ष मा. समीर वर्तक व नाशिक जिल्हाध्यक्ष श्री तुषार शेवाळे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष बळकट होण्यासाठी पर्यावरण विभागात संवर्धनाचे प्रभावीपणे काम करण्यासाठी नांदगाव तालुक्याचे माजी आमदार अनिल दादा आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक जिल्हा ग्रामिण काँग्रेस पर्यावरण विभागाचे प्रदेशाध्यक्ष समीर वर्तक व नाशिक जिल्हा काँग्रेस अध्यक्ष तुषार शेवाळे यांच्या अध्यक्षतेखाली पर्यावरण विभाग कार्यकारिणी जाहीर करण्यात आली यात नाशिक जिल्हा ग्रामीण नांदगाव तालुका काँग्रेस पर्यावरण नांदगाव तालुकाध्यक्षपदी नांदगाव तालुक्यातील घाटमाथ्यावरील बोलठाण पासून तीन ते चार किलोमीटर अंतरावरील गोंदेगाव येथील विलासराव यांची निवड करून नियुक्ती करण्यात आली. यावेळी नाशिक येथे नुकत्याच झालेल्या बैठकीच्या वेळी नाशिक जिल्हा काँग्रेस पर्यावरण विभागाचे प्रदेशाध्यक्ष मा. समीर वर्तक, नाशिक जिल्हा काँग्रेस अध्यक्ष तुषार शेवाळे, नाशिक जिल्हा पर्यावरण विभाग अध्यक्ष विनोद देसले, नाशिक जिल्हा पर्यावरण विभाग सरचिटणीस अमर पटेल, नांदगाव तालुक्याचे माजी आमदार अनिल दादा आहेर, राजेंद्र रिंढे, जातेगाव चे रामदास पाटील, अण्णासाहेब बोडखे, आणि काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

नाशिक जिल्हा ग्रामीण नांदगाव तालुका काँग्रेस पर्यावरण तालुकाध्यक्षपदी विलास सरोवर यांना दिलेल्या नियुक्तीपत्र वर काँग्रेस कमिटीचे श्री विनोद शिवाजीराव देसले नाशिक जिल्हा अध्यक्ष पर्यावरण विभाग नाशिक ग्रामीण यांची स्वाक्षरी आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे