ब्रेकिंग

प्रभाग क्र. १० चे कार्यक्षम नगरसेवक मा.उपमहापौर श्री तुषारशेठ हिंगे यांचा वाढदिवस साजरा

प्रभाग क्र. १० चे कार्यक्षम नगरसेवक मा.उपमहापौर श्री तुषारशेठ हिंगे यांचा वाढदिवस साजरा

मोरवाडी (प्रतिनिधी) दर रविवारची साप्ताहिक पुजा पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर मातेची तर्फे नगरसेवक मा.उपमहापौर श्री तुषारशेठ हिंगे यांचा वाढदिवस करण्यात आला सर्व प्रथम पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून पुजा करण्यात मा.श्री लक्ष्मणजी गोफणे सहायक आरोग्य अधिकारी पिं. चि.महानगर पालिका यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला व नंतर केक कापला यावेळी प्रास्ताविक करताना श्री दिपक भोजने म्हणाले गेली सहा ते सात वर्ष अखंडित अहिल्यादेवी मातेची पुजा समाज बांधव सहकार्य ने चालू आहे करोनाचा काय असल्याने समाज बांधवाची संख्या कमी आहे १०० ते १५० समाज बांधव पुजेला असतात भविष्यात आम्हाला अडचण होऊ नये म्हणून आम्हाला पुतळ्यास जागा देऊन सुशोभीकरण करून भव्य असे स्मारक करून देण्यात यावे श्री तुषारशेठ हिंगे नेहमीच आपल्याला सहकार्य करत असतात श्री विजय भोजने यांनी काही सुचना केल्या की प्रायोगिक तत्त्वावर दररोज आहिल्यामातेचा पुतळा पाण्याने धुवून स्वच्छ करून देण्याचा प्रस्ताव पालिकेने दिला आहे त्यानी दिलेला सुचना सर्वानी मान्य केली

श्री तुषारशेठ हिंगे म्हणाले की धनगर समाज बांधवांनी नेहमीच मला प्रेम दिले पालिकेतून माहिती घेऊन स्मारक स जागा मिळवुन देण्याचा प्रयत्न करील उपस्थित मान्यवरांनी नगरसेवकास शुभेच्छा दिल्या श्री लक्ष्मणजी गोफणे साहेब यांची पदोन्नती झाल्याबद्दल त्या सत्कार उप अभियंता श्री विजय भोजने यांच्या हस्ते समाज बांधवच्या वतीने करण्यात आला यावेळी पत्रकार श्री राम दुधभाते , निलेश वाघमोडे , शिवाजी आवारे , दिपक काळे , शहाजी दन्ने श्री हनुमंत हाके सर, नितीन वाघमोडे , दादासाहेब खरात , विठ्ठल देवकाते , आशोक महानवर , आशोक शेजवळ , श्री महावीर काळे सर , गोरख बंडगर , काका शेळके, आशोक भोगे , धनाजी गाडे , अवधूत वायकुळे व इतर समाज बांधव उपस्थित होते श्री काका शेळके यांनी सूत्रसंचालन केले श्री दिपक भोजने प्रास्ताविक केले विजय भोजने यांनी सर्वाचे आभार मानले

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे