राजकीय

किरीट सोमय्यांनी बोलताना भान ठेवावं, कोविड सेंटर काय कमाईचं साधन आहे का? गुलाबराव पाटलांचे सोमय्यांना प्रत्युत्तर

झूम मराठी वृत्तसेवा

जळगाव :- भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या येत्या दहा दिवसांत ठाकरे सरकारचा कोविड सेंटर घोटाळा बाहेर काढणार असल्याचा इशारा केला आहे. किरीट सोमय्या यांनी मुंबईतील दहिसर, बीकेसी आणि नेस्को कोविड सेंटरला भेट दिली. त्यावेळी सोमय्या यांनी ठाकरे सरकारवर जोरदार टीका करत, घोटाळा उघड करण्याचा इशारा दिलाय. किरीट सोमय्यांच्या या इशाऱ्याला शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय.

गुलाबराव पाटील सोमय्यांना प्रत्युत्तर देत म्हणाले कि, सरकारवर आरोप करण्यासाठी जो तो खिशात कोरोना घेऊन फिरतोय. आली की टाकली पुडी… आली की टाकली पुडी… कोरोना काय कमाईचं साधन आहे का? असा सवाल पाटील यांनी केलाय. कोरोनावरुन काहीही बोलायचं आणि कोणतेही आरोप करायचे असा प्रकार सध्या सुरु आहे. सोमय्यांसारख्या माणसाने असे आरोप करणे बरोबर नाही. जिल्हा रुग्णालय काय कमाईचं साधन आहे का? कोरोना काळात लोक सेवाभावी वृत्तीने लोक शासनाला मदत करत आहेत. त्यामुळे सोमय्या यांनी बोलताना भान ठेवलं पाहिजे. त्यांनी कोरोना जाऊ दे म्हणून देवाला साकडं घातलं पाहिजे, असा सल्लाही पाटील यांनी सोमय्या यांना दिलाय.

किरीट सोमय्या काय म्हणाले?

येत्या दहा दिवसात ठाकरे सरकारचा कोविड सेंटर घोटाळा बाहेर काढणार असल्याचा दावा किरीट सोमय्या यांनी केला आहे. आर्थिक कमाईसाठी सत्ताधाऱ्यांकडून घाबरवण्याचं काम सुरु आहे, असा आरोपही त्यांनी केलाय. मुंबईत कोरोना रुग्णांचा आकडा वाढला असला तरी कोविड सेंटर्स रिकामे आहेत. बीकेसीमध्ये 2 हजार 400 बेडपैकी 800 बेडवर रुग्ण आहेत. दहीसरमध्ये 750 बेड आहेत पण अजून एकही रुग्ण तिथे दाखल नाही. नेस्को सेंटरमध्ये 2 हजार बेड्सपैकी 900 बेड भरले आहेत. याचा अर्थ 98 टक्के रुग्ण आपल्या घरी किंवा नर्सिंग होममध्ये बरे होतात. तसंच ज्यांचे लसीकरण झाले आहे त्यातील 99.99 टक्के लोक सुरक्षित असल्याचा दावाही सोमय्यांनी केलाय.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे