महाराष्ट्र

दहावी, बारावीच्या परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसारच होणार ; राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा खुलासा

झूम मराठी वृत्तसेवा

राज्यात कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे अनेक निर्बंध लागू झाले आहेत. 10 वी आणि 12 वी वगळता सर्व वर्ग 15 फेब्रुवारी पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे 10 वी आणि 12 वी च्या बोर्डाच्या परीक्षा होणार की नाही याबाबत पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम आहे. परंतू राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाने याबाबत खुलासा केला आहे.

राज्यातील 10 वी आणि 12 वीच्या विद्यार्थ्यांसमोर कोरोनाच्या तिसऱ्या लाटेने अनेक प्रश्न उभे केले आहेत. राज्यात कोरोना प्रतिबंधासाठी अनेक निर्बंध घालण्यात आले आहेत. दरम्यान 10 वी आणि 12 वी वगळता इतर सर्व वर्गांना 15 फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे यावर्षीदेखील परीक्षा पुढे ढकलल्या जातात का? की वेळापत्रकानुसारच होणार याबाबत पालक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम आहे. त्यामुळे 10 वी आणि 12 वीच्या परीक्षा वेळापत्रकानुसारच होणार असल्याचे शिक्षण मंडळाने स्पष्ट केले आहे.

दहावी, बारावीच्या परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसार घेतल्या जातील, असे राज्य शिक्षण मंडळाच्या अध्यक्षांनी रविवारी स्पष्ट केले. मात्र, 15 फेब्रुवारीपर्यंत शाळा, महाविद्यालये बंद असल्याने प्रात्यक्षिक परीक्षांसह इतर नियोजन करताना अडचणी येणार आहेत. परीक्षा कशा होणार? या चिंतेने विद्यार्थी, पालक, शिक्षक संभ्रमात आहेत. काही दिवसांपूर्वी राज्य मंडळाने दहावी, बारावी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले. 4 मार्चला बारावी, तर 15 मार्चपासून दहावीची लेखी परीक्षा सुरू होईल. राज्यभरातून दहावी, बारावीचे मिळून सुमारे 32 लाख विद्यार्थी परीक्षेला सामोरे जाणार आहेत.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे