पुणे :- टीईटी परीक्षा घोटाळा प्रकरणी पुणे सायबर पोलिसांनी आणखी दोघांना अटक केली आहे. पुणे सायबर पोलिसांनी नाशिक आणि जळगावमधून या दोघांना अटक केली आहे. नाशिक येथून आरोग्य विभागातील एक टेक्निशियन आणि चाळीसगाव येथून जिल्हा परिषदेच्या शाळेतील एका शिक्षकाला अटक करण्यात आली आहे. या दोघांनी मिळून 350 परीक्षार्थींकडून तीन कोटी 85 लाख रुपये घेऊन ते एजंटमार्फत मुख्य आरोपींना दिल्याची बाब तपासात समोर आलीय.
नाशिक आणि जळगाव येथून अटक करण्यात आलेल्या दोघांनी मिळून 350 परीक्षार्थींकडून तीन कोटी 85 लाख रुपये घेतले आणि ते एजंटमार्फेत मुख्य आरोपींना दिल्याची बाब तपासात समोर आली आहे. सुरंजित गुलाब पाटील (वय 50, रा. नाशिक) आणि स्वप्नील तीरसिंग पाटील (रा. जळगाव) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. या दोघांना 13 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तर यापूर्वी अटकेत असलेले सुनील खंडू घोलप (वय 48, रा. भोसरी) आणि मनोज शिवाजी डोंगरे (वय 45 रा. लातूर) यांना 11 जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे. टीईटी परीक्षा प्रकरणी 13 आरोपींना अटक करण्यात आली असून चार कोटी 68 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
काही दिवसांपूर्वी टीईटी परीक्षा घोटाळा प्रकरणात दिल्ली कनेक्शनही समोर आलं होतं. 31 डिसेंबर 2021 रोजी टीईटी परीक्षा घोटाळ्यात आणखीन दोन जणांना सायबर पोलिसांनी अटक केली. दिल्लीतून पोलिसांनी आशुतोष शर्मा याला अटक केली. अटकेत असलेल्या निशीद गायकवाड याच्या चौकशीतून आशुतोष शर्मा आणि सहकार्याने पेपर पुरविल्याची माहिती समोर आली होती. यासोबतच तुकाराम सुपेच्या ड्रायव्हरलाही
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा