ब्रेकिंगमहाराष्ट्र

बूस्टर डोस देण्यासंदर्भातली मुंबई महापालिकेची नियमावली जाहीर ; नोंदणी कशी कराल ?

मुंबई :- कोरोनाच्या नव्या ओमिक्रॉन व्हेरिएंटने मुंबई शहराची चिंता अधिक वाढवली आहे. गेल्या सात दिवसांत मुंबईत रुग्णसंख्या संख्या झपाट्याने वाढत असून दैनंदिन रुग्णांची संख्या २० हजारांच्या पार गेली आहे.देशभरात सध्या लसीकरण वेगानं सुरु आहे. सर्वांना लसीचे दोन डोस दिले जात आहेत. त्यामुळे ३ जानेवारीपासून देशासह मुंबईतही लहान मुलांच्या लसीकरणास सुरुवात झाली आहे. तर 10 जानेवारी 2022 पासून हेल्थकेअर, फ्रंटलाइन वर्कर्स आणि हृदयविकारासारख्या काही गंभीर आजारांनी ग्रस्त 60 वर्षांवरील लोकांना डॉक्टरांच्या सल्ल्याने बूस्टर डोस दिला जाईल, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही केली होती. त्यानुसार आता देशात नागरिकांना बुस्टर डोस देण्याची सुविधाही सुरु केली जाईल. याचपार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेने एक नवी नियमावली जारी केली आहे. या नियमावलीत पात्र नागरिकांना कोविन पोर्टलवरून नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

काय आहे महापालिकेची नियमावली ?

  • येत्या 10 जानेवारीपासून आरोग्य कर्मचारी, कोव्हिडमध्ये आघाडीवर काम करणारे कर्मचारी आणि 60 वर्ष व त्यावरील नागरिकांना लसीचे डोस देण्यात येणार आहे
  • वरील सर्व जण दुसऱ्या डोसच्या तारखेपासून 9 महिने किंवा 39 आठवडे पूर्ण झाले असल्यास तिसऱ्या डोससाठी पात्र
  • ऑनलाईन आणि नोंदणी पद्धतीनं सुविधा उपलब्ध होणार
  • 60 वर्ष व त्यावरील वयाच्या सहव्याधी असलेल्या व्यक्तींना तिसरा डोस देताना लसीकरण केंद्रावर कोणतेही प्रमाणपत्र जमा किंवा दाखवायची आवश्यकता नाही फक्त अशा व्यक्तींनी त्यांच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार लसीकरणाबाबत निर्णय घ्यावा
  • सर्व नागरिकांना शासकीय केंद्रावर लसीकरण विनामूल्य होणार आहे
  • जर वरील कोणत्याही नागरिकांना खासगी लसीकरण केंद्रावर लस घ्यायची असल्यास केंद्र सरकारने घोषित केलेल्या किंमतीत लस घ्यावी लागेल.

नोंदणी कशी कराल ?

पात्र नागरिकांना लसीचा बुस्टर डोस हा ऑफलाईन आणि ऑफलाईन नोंदणी पद्धतीने घेण्याची सुविधा पालिकेने उपलब्ध करुन दिली आहे. दरम्यान ऑनलाईन पद्धतीने बुस्टर डोस घेऊ इच्छिणाऱ्या पात्र नागरिकांना यासाठी कोविन पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीनं नोंदणी करणं आवश्यक असेल. तर बुस्टर डोस देताना लसीकरण केंद्रावर कोणतेही प्रमाणपत्र जमा किंवा दाखवायची आवश्यकता नाही, फक्त अशा व्यक्तींनी त्यांच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार लसीकरणाबाबत निर्णय घ्यावा, असं मुंबई महापालिकेच्यावतीनं कळवण्यात आलं आहे. सर्व नागरिकांना शासकीय केंद्रावर लसीकरण विनामूल्य होणार आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे