आपल खान्देश

चाळीसगाव तालुक्यात जिल्हापरिषदेचे मुख्यधिकारी पंकज आशिया यांची जि.प शाळा उपक्रमाला भेट दिली

चाळीसगाव (प्रतिनिधी) जळगाव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा. श्री.पंकज आशिया यांनी जि.प.शाळा,उपखेड ता.चाळीसगाव येथे येऊन उपक्रमाअंतर्गत राबविण्यात येत असलेल्या उपक्रमाची माहिती घेतली.

सदर उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले. त्यांच्या समवेत चाळीसगाव तालुका पंचायत समितीचे गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर, सहा.गटविकास अधिकारी कैलास माळी जिभू , गटशिक्षणाधिकारी विलास भोई साहेब, शिक्षण विस्तार अधिकारी श्री.मिलिंद चव्हाण साहेब व श्री. आत्माराम अहिरे साहेब, बांधकाम खात्याचे अभियंता श्री बरे रावसाहेब, उपखेड गावाचे बिनविरोध लोकनियुक्त सरपंच श्री महेश मगर.ग्रामसेवक सुभाष राठोड,शाळेचे मुख्याध्यापक श्री संजय धुडकू मोरे व शाळेतील शिक्षकवृंद श्री.शिवाजी माळतकर, श्री.मदन येवले, श्रीमती सुनीता पाटील,श्री. अनिल महाले, श्री. सागर सोनवणे, श्री.राहुल जाधव आणि गावातील नागरिक उपस्थित होते.

विशेष म्हणजे ग्रामपंचायत कार्यालयाकडून गावातील प्रत्येक कुटुंबाला कॅलेंडर मोफत देण्यात येणाऱ्या कॅलेंडरचे प्रकाशन माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी मा. श्री.पंकज आशिया यांचे हस्ते करण्यात आले. ज्या देणगीदार दात्यांनी शाळा डिजिटल करण्यासाठी व गावात आर. ओ. बसविण्यासाठी आर्थिक लोकसहभाग दिला त्यांचे छायाचित्र त्यांच्या वाढदिवसाच्या महिन्याच्या पानावर लावण्यात आले आहे.याबद्दल आशिया साहेब यांना विशेष आनंद झाला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.सागर सोनवणे सरांनी केले व आभार प्रदर्शन मा.गटशिक्षणाधिकारी श्री.विलास भोई साहेब यांनी केले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे