रायपूर येथील धर्म संसदेत महात्मा गांधींवर अतिशय शिवराळ भाषेत टिप्पणी करणाऱ्या कालीचरण महाराज यांना अखेर अटक करण्यात आली आहे. छत्तीसगडमधील रायपूर पोलिसांनी ही कारवाई केलीय. कालीचरण महाराजाविरोधात तिक्रपरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दाखल गुन्ह्यानुसार पोलिसांनी कारवाई करत कालीचरण महाराजला मध्यप्रदेशमधील खजुराहोमधून ताब्यात घेतलंय.
महात्मा गांधींबद्दल अत्यंत शिवराळ भाषेत टिप्पणी केल्याप्रकरणी कालीचरण महाराज यांच्यावर रायपूरसह देशातील अनेक ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. काल (29 डिसेंबर) संध्याकाळीच कालीचरण महाराज रायपूरहून पळून गेल्याची बातमी समोर आली होती. त्यानंतर रायपूर पोलिसांनी महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशात त्यांचा शोध सुरू केला होता. अखेर आता त्यांना खजुराहो येथून अटक करण्यात आली आहे.कालीचरण महाराजांविरुद्ध रायपूरमध्ये कलम 505 (2) आणि कलम 294 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. रायपूरचे माजी महापौर आणि विद्यमान सभापती प्रमोद दुबे यांनी त्यांच्याविरोधात FIR दाखल केला होता.
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा