जळगाव | भाजपला रामराम करत एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. भाजप सोडण्याआधी आणि नंतर खडसे यांनी जोरदार टीका केल्याचं पाहायला मिळालं आहे. भाजपमध्ये दुय्यम वागणूक मिळत असल्याचा आरोप करत खडसेंनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. यामुळे उत्तर महाराष्ट्रात भाजपला मोठा धक्का बसला असून खडसेंनी आता भाजपवर टीकास्त्र डागायला सुरुवात केली आहे.
भाजपमध्ये ओबीसी नेत्यांवर अन्याय केला जात असल्याचा आरोप आता खडसेंनी केला आहे. ‘मागील काळात ओबीसी नेत्यांना भाजपनं नेहमीच सहकार्य केल्याचं पाहायला मिळत होतं. पण गेल्या काही वर्षात भाजपमध्ये ओबीसी नेत्यांना टार्गेट केलं जात केलं जात असल्याचा आरोप खडसेंनी पुन्हा एकदा केला आहे. गेल्या ४-५ वर्षांचा विचार केला तर भाजपचे काही नेते ओबीसी नेत्यांना टार्गेट करत असल्याचं पाहायला मिळत आहे. सर्वात जास्त गोपीनाथ मुंडे यांचा छळ करण्यात आला,’ असा आरोपही खडसे यांनी केला आहे.
खडसेंनी भाजपवर केलेल्या या गंभीर आरोपांमुळे आता महाराष्ट्रातील राजकारण चांगलेच तापण्याची शक्यता आहे. अद्याप तरी भाजपच्या कोणत्याही नेत्याकडून खडसेंनी केलेल्या या आरोपांवर कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही आहे. परंतु यावर आता भाजप कोणती भूमिका घेत आहे, व खडसेंना कशाप्रकारे प्रतिउत्तर देत आहे हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा