अघोषित शिक्षक महासंघाच्या आझाद मैदान मुंबई येथील आंदोलनास युवाशाही संघटना महाराष्ट्र संघटनेचा पाठींबा.
मुंबई (प्रतिनिधी) अघोषित शिक्षक महासंघाच्या बेमुदत धरणे उपोषण आंदोलनास व शिक्षक समन्वय संघाच्या प्रचलित प्रमाणे अनुदासाठी करण्यात येणाऱ्या आंदोलनास युवाशाही संघटना महाराष्ट्र राज्य संघटनेचा जाहीर पाठिंबा
मुंबई येथे आझाद मैदानावर राज्यातील अघोषित प्राथमिक,माध्यमिक,उच्च माध्यमिक शाळा व नैसर्गिक तुकड्यांना अनुदान मिळावे या मागणीसाठी स्थापनाकरण्यात आलेल्या अघोषित शिक्षक महासंघाच्या बेमुदत धरणे आंदोलनास युवाशाही संघटना महाराष्ट्र राज्य संघटनेचा जाहीर पाठिंबा देण्यात आला तसेच प्रचलित प्रमाणे अनुदानासाठी स्थापन करण्यात आलेल्या समन्वय संघाच्या आंदोलनास ही सक्रिय सहभाग व पाठिबा दिला
युवाशाही संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने जाहीर पाठिंबा अघोषित शिक्षक महासंघाच्या आझाद मैदान मुंबई येथील आंदोलनात युवाशाही संघटना महाराष्ट्र राज्य संघटनेचे अध्यक्ष तुषार देशमुख संघटनेच्या उपाध्यक्षा अश्विनी कडू राज्य कार्यकारणी सदस्य सुरेश सावळे प्रत्यक्ष सहभागी मागण्या मान्य होईपर्यंत आमचा सदैव पाठिंबा असेल. सर्व याद्या घोषित करून प्रचलित नियमानुसार अनुदान मिळाले पाहिजे व पंचवीस-तीस वर्षाचा वनवास संपला पाहिजे.
सर्व विनाअनुदानित अंशतः अनुदानित शिक्षक हे खरेतर प्रचिलीत प्रमाणे अनुदान घेण्यास हकदार आहेत, तसेच अघोषित च्या शिक्षकांना न्याय मिळावा या साठी मी सुरवातीपासून लढत आहे व शेवटच्या अघोषित शिक्षकाला न्याय मिळवून देई पर्यंत मी त्यांच्या सोबत असेल असा निर्धार व्यक्त केला.




