‘सैराट’मधील प्रिन्सला अहमदनगरचे पाेलिस करणार अटक!
नगर (झूम वृत्तसेवा) ‘सैराट’ सिनेमातील प्रिन्सची भूमिका साकारणारा सूरज पवार यानं नाेकरीचं आमिष दाखवून अहमदनगरच्या नेवासा तालुक्यात एकाला फसवल्याचा आराेप आहे. मंत्रालयात नाेकरी लावून देताे, असे सांगून ही फसवणूक केली आहे. सूरजसह इतर त्याच्याबराेबर असलेल्या साथीदारांचीही नावे यात आहेत. महेश वाघडकर (रा. नेवासा) यांनी फिर्याद दिली आहे.
वाघडकर यांच्या फिर्यादीवरून फसवणूक करणे, बनावट शिक्के आणि दस्तऐवज तयार करणे या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी दत्तात्रय क्षीरसागर, आकाश शिंदे आणि ओमकार तरटे या तिघांना अटक करण्यात आली. या तिघांना १९ सप्टेंबरपर्यंत पाेलिस काेठडीत ठेवण्याचा न्यायालयाचा आदेश आहे, अशी माहिती पाेलिस निरीक्षक प्रताप दराडे यांनी दिली.
राहुरी पाेलिसांच्या तपासात ह्या रॅकेटमध्ये सिने कलाकार असल्याचं समाेर आलं. राहुरी पाेलिसांना तपासात ठाेस पुराव्यांबराेबरच सैराट चित्रपटातील प्रिन्सची भूमिका करणारा सूरज पवार याचे नाव समाेर आले आहे. त्याला ताब्यात घेण्यासाठी राहुरी पाेलिसांचे पथक रवाना झाल्याची माहिती पाेलिस निरीक्षक प्रताप दराडे यांनी दिली. सूरज यानं मंत्रालयातील बनावट शिक्के बनवून घेतल्याचं आराेपींकडे केलेल्या चाैकशीत समाेर येत आहे. याशिवाय या प्रकारात मंत्रालयातील काेणाचा सहभाग आहे का? याची चाैकशी हाेणार असल्याचे पाेलिस निरीक्षक प्रताप दराडे यांनी सांगितलं.
नेवासे तालुक्यातील महेश वाघडकर यांना मंत्रालयात नाेकरी लावून देताे, असं आमिष दाेघांनी दिलं हाेतं. यासाठी पाच लाख रुपयांची मागणी करण्यात आली हाेती. नाेकरीवर रूजू झाल्यानंतर तीन लाख आणि नंतर दाेन लाख, अशी ही बाेलणी झाली हाेती. पैसे देण्यासाठी महेश हे राहुरीत गेल्यावर आपली फसवणूक हाेत असल्याचं लक्षात आलं. यानंतर त्यांनी पाेलिस ठाण्यात तक्रार दिली. या सर्व प्रकार रॅकेट असल्याची माहिती समाेर आली. चाैकशी केल्यानंतर सिनेमात काम करणारे कलाकारांचा यात समावेश असल्याचे समाेर आलं.



