पाचोऱ्यातील कासार बंधुची जनेरिक मेडिकल जनतेच्या सेवसाठी सज्ज..

दिलीप जय परदेशी
पाचोरा शहरातील जनरिक ओषधी क्षेत्रात नावाजलेले “जनओषधी” ह्या मेडिकलचे कासार बंधू यांचे “न्यु कासार जनरिक मेडिकल अँड जनरल स्टोअर” नावाचे ओषधीसाठीचे नवीन मेडिकल रुग्णासाठी नुकतेच पाचोरा शहरात जामनेर रोड नुकतेच सुरू झाले असून, सध्या तेथे ४०० प्रकारची स्वस्त व गुणवत्तापूर्ण औषधी उपलब्ध झाली आहेत.
या मेडिकल मध्ये रुग्णासाठी सर्व प्रकारच्या स्टँडर्ड, जेनरिक कॉस्मेटिक बी.पी. व शुग (Diabetes) आयुर्वेदिक कॅन्सर, किडनी, सरिकल, मेंदू विकारांवरीलऔषधी स्वस्त दरात उपलब्ध आहेत, तसेच अनेक प्रकारच्या सर्जिकल औषधी वर 30% ते 90% पर्यंत सूट Adult Diper, Comod Chair (संडास खुर्ची), एअरबेड वॉटर बेड, वाकर, शुगर मशीन, रक्तदाब मशीन नेब्युलाईझर अल्प दरात उपलब्ध आहेत.
मधुमेह, हृदयविकार, रक्तदाब, गॅस्ट्रो आदींवरील औषधांसह प्रतिजैविके-जीवनसत्वांचाही समावेश आहे. लवकरच यात दुपटीने वाढ होणार आहे. विशेष म्हणजे ब्रँडेड औषधींच्या तुलनेत सर्वसाधारण जनऔषधी ही १५ ते २० पटींपर्यंत, तर, काही इमर्जन्सी औषधे-इंजेक्शन्स ५० ते १०० पटींपर्यंतही स्वस्त व तितकीच गुणवत्तापूर्ण आहेत, प्रत्येक जनऔषधावर त्या त्या औषधाचा (मॉलिक्यूल) उल्लेख आहे व ‘जेनेरिक ब्रँड’खालीच त्याची विक्री होते. ‘इंडियन काउंसिल ऑफ मेडिकल रिसर्च’च्या (आयसीएमआर) मार्गदर्शक तत्वांनुसार प्रत्येक जनऔषधीची निर्मिती होते. त्यामुळे ब्रँडेड औषधांइतकाच जेनेरिक औषधांचा रुग्णांवर परिणाम होतो.
जेनेरिक औषधांचा डोस, सुरक्षा, धोका, दुष्परिणाम किंवा ‘साइड इफेक्ट’देखील ब्रँडेड औषधांइतकाच असतो, मात्र नव्या औषधांच्या निर्मितीसाठी औषधी कंपन्यांना संशोधन-विकासावर मोठा खर्च करावा लागतो; तसेच मार्केटिंग, प्रमोशन व इतर बाबींवरही मोठा खर्च होतो. त्यामुळेच ब्रँडेड औषधी महाग, जेनेरिक औषधी स्वस्त असल्याचे शहरातील पहिल्या स्टोअरचे संचालक विशाल कासार व यज्ञेश कासार बंधू यांनी मीडियाशी बोलतांना सांगितले.
पाचोरा शहरातील जानरिक ओषधी क्षेत्रात नावाजलेले “जनओषधी” ह्या मेडिकलचे कासार बंधू हे फक्त मेडिकलच नाहीतर मोफत रुग्णवाहिक सुद्धा रुग्णांच्या सेवेत कार्यरत आहॆ संचालक विशाल कासार व यज्ञेश कासार यांच्यावर शुभेच्छाचा वर्षाव होत आहॆ.



