गुन्हेगारीब्रेकिंग

पाचोऱ्यात किरकोळ कारणावरून २ तरुणांवर चॉपरने प्राणघातक हल्ला.!

पाचोरा टुडे | पाचोरा शहरातील छत्रपती संभाजी राजे चौकात मंगळवारी दि. २१ ऑक्टोबर रोजी रात्री साडेअकरा वाजता सुमारास एका तरुणाने किरकोळ कारणावरून २ तरुणांवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्रयत्न केला. यात एका तरुणाच्या पोटात चॉपर मारून गंभीर जखमी केले आहे तर दुसऱ्याच्या मानेवर चॉपर मारण्याचा प्रयत्न करून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी पाचोरा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर माहितीवरून जखमी यश अनिल पाटील (वय २० वर्षे रा. देशमुख वाडी, पाचोरा) यांनी फिर्याद दिली आहे. पाचोरा शहरात संभाजी चौकात यश पाटील हा मयूर विनोद भोई (वय २० रा. आठवडे बाजार, पाचोरा) याच्यासोबत २१ ऑक्टोबर रोजी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास फटाके फोडत होता. त्यावेळेला संशयित आरोपी शिव गोसावी (पूर्ण नाव गाव माहित नाही) हा दुचाकीवर तिथे आला. त्याने दुचाकीमधून चॉपर काढून मयूर भोई याच्या पोटात मारला. तसेच फिर्यादी यश पाटील यांच्या मानेवर चॉपर मारण्याचा प्रयत्न करून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. याबाबत यश पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविला असून पुढील तपास स्थानिक पोलीस करीत आहेत.

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Zoom Team

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे