आडगाव ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच व 11 सदस्या विरोधतील अपात्रतेचा अर्ज फेटाळला, जिल्हाअधिकारीचां निर्णय!
झूम मराठी
जळगाव (प्रतिनिधि) एरोंडोल तालुक्यातील आडगाव ग्रामपंचायतीच्या मागील वर्षी अटीतटीत झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीचा खर्चाचा हिशोब मुदतीत व कायदेशीर रितिने दिला नाही. म्हणून सरपंच सुनील दिलीप भील, उपसरपंच दिलीप नथ्थु पवार व 11 सदस्याना अपात्र ठरविण्यात यावे म्हणून डॉ प्रवीण वाघ यांनी विवाद अर्ज दिलेला होता. दाखल अर्जा वर चौकशी होऊन सबळ पुराव्या अभावी व मुदतित खर्च सादर केला असल्याचे सिद्ध झाल्या मुळे जिल्हाधिकारी डॉ. अभिजित राऊत यांनी सरपंच, उपसरपंच व सदस्याना पात्र ठरविले आहे.
या बाबत सविस्तर वृत असे की, मागील वर्षी आडगाव ग्रा. प. ची निवडणूक अटीटटित व शांततेत पार पडली होती. मात्र सरपंच सुनील भील,उपसरपंच दिलिप पवार, सदस्य प्रल्हाद पोपट पाटील, प्रवीण सुदाम पाटील, सौ शारदा धीरज पाटील, रविन्द्र हरी साबळे, सौ संगीता रविन्द्र महाजन, सौ माया भय्या वनवे, सौ कविता दिनेश देवरे, सौ आशा गुलाबराव साबळे, सौ सिमा राहुल महाजन, सौ मुक्ताबाई जोरसिंग राठोड, सौ सखुबाई सुकदेव माळी यांनी निवडून आल्याचे दिनांका पासून 30 दिवसाच्या आत विहित मुदतित विहित रीतीने निवडणूक खर्चाचा हिशोब दिलेला नाही. म्हणून त्यांना सदर पदावरुन अपात्र ठरविण्यात यावे. असा विवाद अर्ज कलम 14 ब. प्रमाणे डॉ.प्रवीण वाघ यांनी जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत राऊत यांचे कडे दिला होता. त्यावर चौकशी होऊन सद्स्यानी ऍफिडेविटसह व दैनंदिन खर्चाची बिलांसह विहित मुद्तीत व विहित रीतीने. खर्चाचा हिशोब सादर केलेला आहे, लोकशाही मार्गाने जनतेतून निवडून आलेल्या सदस्याना तांत्रिक कारणाने अपात्र ठरविता येणार नाही असा अँड भोसले यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून दाखल विवाद अर्ज फेटाळण्यात येवून सरपंच, उपसरपंच व 11 ग्रा.प.सदस्यांना पात्र ठरविले आहे. याबाबतचा महत्वपूर्ण निकाल जिल्हाधिकारी यांनी दिला आहे. या निकाला मुळे ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण तयार झाले आहे. सरपंच, उपसरपंच व 11 ग्रा.प.सदस्याचे वतीने अँड विश्वासराव भोसले यांनी काम पाहिले. या निकाला कडे सम्पुर्ण तालुक्याचे लक्ष लागुन होते.सत्याचा विजय झाल्याची प्रतिक्रिया उपसरपंच श्री दिलीप पवार सर यांनी प्रसार माध्यमाना दिली आहे.




