आपल खान्देश

पाचोरा शिवसेना- युवासेनेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या विटंबने विरोधात निदर्शने!

महाराजांच्या पुतळा विटंबनेचा राज्यभर निषेध करण्यात येत आहे. शिवसेना – युवासेना पाचोरा व भडगाव च्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला.

झूम मराठी वृत्त सेवा

पाचोरा (प्रतिनिधी) कर्नाटकाची राजधानी बंगळूरु येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आल्याची संतापजनक घटना घडली. पुतळ्याच्या विटंबनेचा राज्यभर निषेध करण्यात येत आहे. शिवसेना – युवासेना पाचोरा व भडगाव च्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला.

बंगळूर येथे झालेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या विटंबने विरोधात आणि या “घटनेला छोटीशी घटना” म्हणून वक्तव्य करणारा कर्नाटकचे भाजपाचे मुख्यमंत्री बसवराज बोमय्या याच्या विरोधात पाचोरा शहरात छत्रपती शिवाजी महाराज चॊकात सुमित पाटील यांच्या नेतृत्वात शिवसेना – युवासेना पाचोरा व भडगावच्या वतीने जाहीर निषेध केला करण्यात आला.

शिवसैनिकांनी कर्नाटकचे भाजपाचे मुख्यमंत्री बसवराज बोमय्याचा पुतळा जाळण्यात आला व त्यांच्या विरोधात घोषणा देऊन परीसर दणानून सोडला.

 

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे