आपल खान्देशमहाराष्ट्रराजकीय

पाचोरा Live 24-पाचोरा कॉग्रेस अध्यक्षाने घेतली पालकमंत्रींची भेट : भेटीचे खरे कारण गुलदस्त्यात!!

 

तालुक्यातील शिवसेना – कॉग्रेस यांच्यात ठिणगी पडली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात वरीष्ठ पातळीवरील भेटींना महत्व येणार आहे

पाचोरा (प्रतिनिधी) – जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री महाविकास आघाडीचे प्रमुख ना. पाटील यांची कॉग्रेस अध्यक्षा ने भेट घेतली असून भेटीचे कारण गुलदस्त्यात आहे.

जळगाव जिल्ह्य़ाचे पालकमंत्री तथा महाविकास आघाडीचे प्रमुख ना. गुलाबराव पाटील यांची नुकतीच भेट जळगाव येथील अंजिठा विश्राम गृहावर पाचोरा तालुका कॉग्रेस अध्यक्ष सचिन सोमवंशी यांनी भेट घेतली या भेटीत तालुक्याचा आढावा देत पाचोरा तालुक्यातील कॉग्रेस पदाधिकारींचे शिष्टमंडळ लवकरच भेट घेणार असून यासाठी वेळ मागितली असे कारण श्री. सोमवंशी यांनी देत जिल्ह्य़ाचे महाविकास आघाडीचे पालक असल्याने कॉग्रेस पदाधिकारी यांचे कुठलेही कामे ना. गुलाबराव पाटील यांनी करण्याचे आश्वासन दिले आहे. तालुक्यातील विविध समस्या सह शासनस्तरावरील अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न केला जाईल असेही याभेटीत ना. पाटील यांनी आश्वासित केले. असे असले तरी भेटीचे खरे कारण मात्र गुलदस्त्यात असल्याचे बोलले जात आहे. तालुक्यातील शिवसेना – कॉग्रेस यांच्यात ठिणगी पडली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात वरीष्ठ पातळीवरील भेटींना महत्व येणार आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे