आपल खान्देश
पाचोरा नगरपरिषदेच्या वतीने पर्यावरण पुरक गणेशोत्सव स्पर्धा आयोजन
पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी पाचोरा नगरपरिषदेचे प्रयत्न, पर्यावरण पुरक गणेशोत्सव स्पर्धा आयोजन केले आहे अशी माहिती नगरध्यक्ष श्री संजय गोहील व मुख्यधिकारी श्रीमती शोभा बाविस्कर यांनी दिली
झूम मराठी पाचोरा
पाचोरा नगरपरिषदे मार्फत माझी वसुंधरा अभियानांतर्गत पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी मोहीम हाती घेतली आहे. त्यातीलच पुढचे पाऊल म्हणून नगरपरिषदेमार्फत सर्व नागरिक व विद्यार्थी यांच्या करीत इको फ्रेंडली गणेश मूर्ती स्पर्धा आयोजीत करण्यात आली आहे.
सदर स्पर्धे अंतर्गत शहरातील सर्व मंडळ्याना तसेच घरगुती गणेश भक्तांना नगर परिषद पाचोरा मार्फत आवाहन करण्यात आले आहे , त्यांनी नैसर्गीक, घरगुती व सोप्या अश्या साधनांचा वापर करून गणेश मूर्ती तयार करावी तसेच सजावटी साठी प्लास्टीक, थर्माकॉल चा वापर टाळावा, स्वच्छतेचा अथवा आरोग्याचा संदेश देणारी फलके (कापडी / कागदी) लावावी, कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संदेश किंवा पथनाट्य, नाटीका इ. सादरीकरण करणे, गणेशपुजनातील निर्माल्यापासुन घरच्या घरी खत निर्मीती करणे, इ. गोष्टीची अंमलबजावणी करुन इको- फ्रेंडली गणेशोत्सव सादर करणा-या प्रथम 3 मंडळे व प्रथम 3 घरगुती गणेश भक्तांना नगर परिषदे मार्फत सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देउन गौरवण्यात येईल.
नाव नोंदणी फक्त 14 सप्टेंबर 2021 रोजी पर्यंत खालील नंबर वर करणे बंधनकारक राहिल. 1) श्री. पवार सर- 7387940717, 2) श्री. निलेश सर- 9834404063
टिप:- स्पर्धकांनी त्यांनी वरिल पैकी ज्या घटकाची अंमलबजावणी केली आहे त्याची छायाचित्रे पाचोरा नगर परिषदेच्या फेसबुक पेजला टॅग करावे असे आवाहन नगराध्यक्ष, नगर परिषद पाचोरा, मुख्याधिकारी नगर परिषद पाचोरा, उपनगराध्यक्ष न.प.पाचोरा, आरोग्य सभापती न.प.पाचोरा, स्वच्छता विभाग प्रमुख, सर्व सनमानीय सदस्य व न.पा. अधिकारी व कर्मचारी यांनी केले आहे.


