आपल खान्देशमहाराष्ट्र

नगरविकास मंत्री ना.एकनाथ शिंदे यांचा जळगाव महापालिकेला भेट!

जळगाव |राज्याचे नगरविकास मंत्री ना एकनाथ शिंदे आज जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्या दरम्यान जळगाव महानगरपालिकेच्या कामांचा आढावा घेण्याकरिता बैठकीचे आयोजन करण्यात आले. जळगाव महानगरपालिका क्षेत्रातील लोकोपयोगी विकास कामांसाठी निधी अपुरा पडू देणार नाही अशी ग्वाही दिली.

तब्बल दहा तास प्रतिक्षे नंतर जळगाव पालिकेला भेट

जळगाव महापालिकेत भेट देऊन ते विकास कामांचा आढावा घेणार होते. एकनाथ शिंदे यांचा जळगाव महापालिका भेटीचा कार्यक्रम सकाळी 11 वाजता होता. परंतु जळगाव महापालिकेस भेट न देता मंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्या निवासस्थानी सांत्वनपर भेट दिली. त्यानंतर ते थेट पाचोरा येथे रवाना झाले.

जळगाव नपातील विविध विषयांचा आणि शहरातील विकास कामा संदर्भात असलेल्या बाबींचा आढावा घेण्यासाठी आयोजित केलेल्या आढावा बैठकीला नगरविकास मंत्री ना.एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीला सुरुवात झाली.

यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी महापालिकेस विकास कामासाठी निधी देण्याची मागणी केली. तसेच महापालिकेवर असलेल्या कर्जाची माहिती दिली. विकासासाठी तातडीने निधी घोषित करावा अशी अपेक्षाही पाटील यांनी व्यक्त केली. यावेळी बोलताना मंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, जळगाव महापालिकेत सत्तांतर झाले आहे. त्यामुळे विकासाची जबाबदारी अधिक वाढली आहे. जळगावच्या विकासासाठी भरीव निधी देण्यात येईल. त्यासाठी अधिकाऱ्यांसोबत मुंबईत बैठक घेण्यात येईल व प्रश्न सोडविण्यात येईल, असे आश्वासन दिले. मात्र कोणतीही निधी देण्याची घोषणा त्यांनी केली नाही.

ना.एकनाथ शिंदे यांचा चांदीची गदा भेट 

जळगाव महापौर जयश्री महाजन व उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी ना.एकनाथ शिंदे यांचा चांदीची गदा देऊन तर पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांचा चांदीची तलवार देऊन सन्मान केला. यावेळी आमदार किशोर आप्पा पाटील, आमदार चंद्रकांत पाटील, आमदार चिमनराव पाटील, महापौर जयश्री महाजन, संजय सावंत, विलास पारकर, मनपा आयुक्त सतिष कुलकर्णी आदी उपस्थित होते 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे