Pachora | जयकिरण प्रभाजी न्यू इंग्लिश मीडियम शाळेत विठ्ठल नामाची भरली शाळा…
दिंडी पालखी सोहळ्याचे आयोजन केले या पालखी सोहळ्यात विद्यार्थ्यांनी संताच्या वेशभूषेत आपला सहभाग नोंदवला
- दिलीप जय परदेशी @ झूम मराठी मीडिया
महाराष्ट्रातील सर्वात मोठा सण असलेल्या आषाढी एकादशीचे महत्त्व लहान वयातच विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजावे यासाठी जयकिरण प्रभाजी न्यू इंग्लिश मीडीयम स्कूलने दरवर्षी प्रमाणे आषाढी एकादशी दिंडी सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. शाळेतील सर्व मुला-मुलींनी यावेळी वारकऱ्यांचे पोशाख परिधान केले होते.
कोणी विठोबा, रुखुमाई, कोणी संत तर कोणी वारकरी बनले होते. सकाळी शाळेच्या मैदानावर पालखी सोहळा पार पडताच पंढरपुरच्या वारीप्रमाणेच रिंगणाचे देखिल आयोजन करण्यात आले होते, मुलांच्या हातात भगवे झेंडे तर मुलींच्या डोक्यावर तूळशी वृंदावन हे बघून, हे जणू खरच पंढरपुरच्या वारीला निघाल्याचा भास होत होता.
पालखी सोहळ्यात विद्यार्थ्यांनी संताच्या वेशभूषेत आपला सहभाग नोंदवला जय जय रामकृष्ण हरी या नामगजरात ही सर्व लहान विठ्ठल भक्त जणु काही वारकरीच दिसत होते कपाळी बुक्का गळ्यात टाळ वाजवत संपूर्ण परिसर अवघे गरजे पंढरपुर चालला नामाचा गजर जय जय रामकृष्ण हरी माऊलीच्या नामाने दुमदुमुन गेला.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष दिनेश बोथरा, सचिव जीवन जैन, सहसचिव संजय बडोला, खजिनदार जगदीश खिलोशिया, स्कूल कमिटी चेअरमन लालचंद केसवाणी, स्कूल कमिटी सचिव रितेश ललवाणी, संचालक संजय चोरडीया, गुलाब राठोड प्रभुलाल शर्मा, गोपाल पटवारी, प्रिती जैन, महेंद्रकुमार हिरण, अशोककुमार मोर, शेखरकुमार धाडीवाल यांच्या आदेशाने तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका पुष्पलता पाटील व सीईओ अतुल चित्ते सर यांच्या मार्गदर्शनाखाली निर्मला पाटील, प्रतिभा मोरे, रुपाली जाधव प्रिती शर्मा, योगिता शेंडे, पुजा पाटील, ज्योती बडगुजर, कविता जोशी, अश्विनी पाटील, चेतना पाटील, सविता माळी, रूपाली देवरे, भाग्यश्री ब्राम्हणकर, विद्या थेपडे, शितल महाजन, स्मिता देशमुख, हरिप्रिया नम्र, किशोरी साळुंखे, वाल्मिक शिंदे,किरण बोरसे, संगिता पाटकरी, पुजा अहिरे, शालिनी महाजन, रुक्मिणी कासार, पुजा देसले, निवृत्ती तांदळे, कृष्णा शिरसाठ, आनंद दायमा, मनोज बडगुजर, शिवाजी ब्राम्हणे, अलका बडगुजर, अश्विनी पाटील, सुनिता शिंपी, मनिषा पाटील, शितल पाटील, शिवाजी पाटील, विकास मोरे या सर्वांनी आपापला सहभाग नोंदवला.




