आपल खान्देशआरोग्य व शिक्षण

पाचोरा तालुक्यातील कासमपुरा शाळेतील विदयार्थ्यांची निघाली वारकरी पायी दिंडी…

  • लोहारा प्रतिनिधी – दिलीप राजपूत

पाचोरा तालुक्यातील शहापूरा जवळच असलेल्या कासमपूरा येथे आज श्री रामसीता शिक्षण प्रसारक मंडळ संचलित माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, कासंमपुरा यांच्या वतीने पायी दिंडीचे आयोजन मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने करण्यात आले. 

आषाढी एकादशी निमित्त भक्तीमय वातावरनात रामसीता शिक्षण प्रसारक मंडळ संचलित माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी पारंपरिक विठ्ठल-पांडुरंग वेशभूषा करून दिंडीत भाग घेतला. पालखी सजवून हरिनामाचा गजर करत परिसर दुमदुमून गेला होता.

पायी दिंडीमध्ये विद्यार्थ्यांनी विविध प्रकारच्या पारंपरिक वेशभूषा करून भक्तिभावाने सहभाग घेतला. टाळ- मृदंगाच्या गजरात हरिपाठ, अभंग आणि भजनांनी वातावरण पवित्र झाले होते. विद्यार्थ्यांचे पालक आणि ग्रामस्थांनीही या कार्यक्रमात मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.

शाळेतील विद्यार्थ्यांनी अभंग किर्तन तसेच फुघड्या खेळून कार्यक्रमांमध्ये रंग भरला,यावेळी शाळेचे संस्थाचालक श्री योगेश दादा यांनाही याचा मोह आवरला गेला नाही त्यांनी देखील सहपत्नीक कार्यक्रमात सहभागी होऊन फुगडी खेळली.

उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विद्यालयाचे मुख्याध्यापक किरण चौधरी, संस्था अध्यक्ष योगेशदादा राजपूत, मेघाताई राजपूत, सतीशभाऊ राजपूत, आनंद ढोणी, तसेच सर्व शिक्षकवृंद, प्रशिक्षित कर्मचारी आणि व्यवस्थापन समितीने मोलाचे सहकार्य केले.

या शैक्षणिक संस्थेच्या वतीने प्रत्येक वर्षी अशा प्रकारचे उपक्रम राबवले जात असून विद्यार्थ्यांमध्ये भक्तीभाव, सांस्कृतिक जाणीव आणि समाजाभिमुखता निर्माण व्हावी, हा उद्देश ठेवण्यात येतो.


बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे