ब्रेकिंग

पाचोरा बस स्थानक परिसरात गोळीबारात; एका तरुणांला लागली गोळी..

पाचोरा | शहरात आज दुपारी एक धक्कादायक घटना घडली असून, पाचोरा बस स्थानक परिसरात भरदिवसा गोळीबार झाला. या गोळीबारात एका युवकाचा गंभीर जखमी झाला आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

पाचोरा शहरातील एस टी बस डेपो परिसरात आकाश मोरे नामक याच्यावर अज्ञात इसमाने गोळ्या झाडल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले असून, तो घटनास्थळीच कोसळला स्थानिक नागरिकांनी उपचारासाठी त्या युवकला रुग्णालयात नेले असून प्रकृतिक चिंता जनक आहे, गोळीबार झाल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. स्थानिक नागरिकांनी पोलिसांना तात्काळ माहिती दिली असून, काही क्षणांतच पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

एस टी बस डेपो परिसर सील केला असून, सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत. हत्या नेमकी कोणत्या कारणाने झाली, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. प्राथमिक तपास सुरू असून, आकाश मोरे याचा पूर्वीचा कुठला वाद होता का? याचाही तपास पोलिसांकडून केला जात आहे.

पोलिसांचे आवाहन – नागरिकांनी शांतता राखावी, कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. तपास जलदगतीने सुरू आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे