आपल खान्देशआरोग्य व शिक्षण

निर्मल इंटरनॅशनल स्कूलमधील प्रांजल राय डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धेत द्वितीय!

विद्यार्थ्याचे अभिनंदन करतांना संस्थेचे सचिव श्री. नरेंद्रसिंग सुर्यवंशी, प्राचार्य श्री. गणेश राजपूत, उपप्राचार्य श्री. प्रदिप सोनवणे व प्रशासकीय अधिकारी श्री. संतोष पाटील

पाचोरा:- विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणाबरोबरच त्यांच्या बौद्धिक विकासाला चालना मिळावी याकरिता विविध बाह्य स्वरूपाच्या स्पर्धा परीक्षांचे दालन विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिले जाते त्यात विद्यार्थी नेत्रदीपक अशी कामगिरी करुन सर्वांचेच लक्ष वेधून घेतात.अशाच प्रकारे शाळेतील कु.प्रांजल रवि राय याने डॉ.होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळविला आहे.त्याने उत्तुंग यश संपादन करून निर्मल इंटरनॅशनल स्कूलच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवलाआहे. राज्यस्तरावर होणार्‍या या परीक्षेत त्याने लेखी, तोंडी,प्रकल्प, प्रात्यक्षिक अशा सर्वच स्तरावर चमकदार कामगिरी केली आहे.या यशाबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

या देदीप्यमान यशाबद्दल संस्थेच्या अध्यक्षा सौ. वैशाली सुर्यवंशी, सचिव श्री. नरेंद्रसिंग सुर्यवंशी, शालेय शिक्षण संचालक डॉ. भगवान सावंत, प्राचार्य श्री.गणेश राजपूत, उपप्राचार्य श्री. प्रदिप सोनवणे व प्रशासकीय अधिकारी श्री. संतोष पाटील यांनी त्याचे व त्याला मार्गदर्शन करणार्‍या सर्व शिक्षकांचे अभिनंदन केले आहे.

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Zoom Team

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे